1 / 8उन्हाळा सुरु झाला की आपण थंडगार माठातील पाणी पितो. मातीच्या भांड्यातील पाणी शरीराला थंडावा देते. भांड्यामध्ये खनिजांची गुणवत्ता जास्त प्रमाणात असते. (Is it safe to drink old clay pot water)2 / 8अनेकदा उन्हाळा गेल्यानंतर आपण मातीची भांडी पुन्हा ठेवून देतो आणि पुन्हा पुढच्या वर्षी त्याचा वापर करतो. परंतु, असे करणे आरोग्याच्यादृष्टीने चुकीचे मानले जाते. (Clay pot water side effects)3 / 8जुन्या मातीच्या माठातील पाणी प्यायल्याने सर्दी-खोकल्यासारख्या संसर्गाची तक्रार वाढते. जुन्या मातीच्या भांड्यात पाणी प्यायल्याने काय होते पाहूया. (Drinking matka water tips)4 / 8जुना माठ धुतल्यानंतर बॅक्टेरिया असू शकतात. त्यासाठी धुतल्यानंतर ते नीट वाळू द्या. हे जीवाणू पाण्याद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करु शकणार नाही. 5 / 8पाण्यातील खनिजे भांड्यांच्या पृष्ठभागावर जमा होऊ शकतात. पुन्हा वापरल्यास ते पाण्यात मिसळण्याची शक्यता असते. ज्यामुळे आरोग्याचे नुकसान होईल. 6 / 8जुन्या माठाला वातवरणामुळे शैवाळ येऊ शकते. जर ती सूर्यप्रकाशात ठेवली नाही किंवा योग्यरित्या स्वच्छ केली नाहीत तर जंतू निर्माण होतात. 7 / 8मातीचा माठ वर्षभरापेक्षा जास्त काळ वापरु नका. यामुळे आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. माठ धुतल्यानंतर जोपर्यंत तो पूर्णपणे कोरडा होत नाही. तोपर्यंत वापरु नका. माठाला सूर्यप्रकाशात ठेवा. 8 / 8नवीन माठ खरेदी करत असाल तर पाण्यात भिजवून ठेवा. ज्यामुळे माठासाठी वापरलेला केमिकलचा रंग निघून जाण्यास मदत होईल.