गौरी- गणपतीसमोर काढा फुलांच्या सुंदर रांगोळ्या- बघा झटपट काढून होणाऱ्या ६ सोप्या डिझाईन्स
Updated:September 12, 2024 13:12 IST2024-09-12T13:08:14+5:302024-09-12T13:12:42+5:30

गौरी- गणपतीच्या सणात घरी भरपूर पाहुण्यांची ये- जा सुरू असते. अशावेळी आपल्या घरच्या गौरींसमोर आणि गणपतीसमोर आकर्षक रांगोळी हवीच.. नेहमीचे तेच ते रांगोळी डिझाईन्स काढून कंटाळा आला असेल आणि नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं काढावं वाटत असेल तर फुलं किंवा फुलांच्या पाकळ्या वापरून या काही सुंदर रांगोळ्या तुम्ही काढू शकता. (simple and attractive flower rangoli designs)
घराच्या मुख्य दाराजवळ किंवा गौरी गणपतीच्या मखरासमोर तुम्ही अशा पद्धतीची रांगोळी काढू शकता.(how to draw flower petal rangoli)
गौरींच्या मखरासमोर काढायला या रांगोळ्याही अतिशय आकर्षक आहे. शिवाय अगदी कमी वेळेत झटपट काढून होण्यासारख्या आहेत.
दारासमोरची जागा लहान असेल तर एखादा कोपरा घेऊन तुम्ही अशा पद्धतीची रांगोळी काढू शकता.
कमी जागेत काढण्यासाठी या काही रांगोळ्याही अतिशय सुंदर आहेत. शिवाय यासाठी खूप जास्त फुलांची गरजही नाही. मोजक्या फुलांमध्ये आणि अगदी झटपट या रांगोळ्या काढून होतील.
ही रांगोळी देखील अतिशय सोपी आहे. यामध्ये तुम्ही हवी तशी फुलांची रचना बदलू शकता.
गौरी गणपतीसमोर अशी रांगोळी काढून मध्यभागी पितळाचे किंवा तांब्याचे गंगाळ, तबक किंवा एखाद्या आकर्षक झाडाची कुंडी असं काहीही तुम्ही यामध्ये ठेवू शकता.