संक्रांत स्पेशल रांगाेळी डिझाईन्स, छोट्या जागेतही झटपट काढता येईल आकर्षक- सुबक रांगोळी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2023 4:17 PM 1 / 9१. पुर्वी सणावाराला किंवा कोणत्याही मंगल प्रसंगी मोठमोठाल्या परंतू एकाच प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जायच्या. पण आता मात्र अगदी प्रत्येक कार्यक्रमानुसार किंवा प्रत्येक सणानुसार वेगवेगळी थीम रांगोळी काढण्यात येते. म्हणजे अगदी रांगोळी पाहूनच कोणता सण किंवा कोणता कार्यक्रम आहे, हे सहज ओळखता येतं.2 / 9२. आता लवकरच येणारा आणि ते ही नववर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. संक्रांतीच्या दिवशी आणि तिथून पुढे पंधरा दिवस मग महिलांचा हळदी- कुंकू सोहळा रंगत असतो. संक्रांतीच्या दिवशी किंवा हळदी- कुंकू कार्यक्रमाला काढण्यासाठी एखादं सुरेख आणि झटपट होणारं सोपं रांगोळी डिझाईन शोधत असाल तर या काही रांगोळ्या एकदा बघाच.. यातून आयडिया घेऊन तुम्हाला आणखी छान रांगोळी नक्कीच काढता येईल.3 / 9३. संक्रांतीचा सण आणि हळदी- कुंकू कार्यक्रम या दोन्ही गोष्टी अगदी उत्तमपणे मांडणारी ही रांगोळी. डिझाईन तसं सोपंच आहे. फक्त थोडा निवांत वेळ काढून ही रांगोळी काढावी लागेल. 4 / 9४. हे एक सुरेख डिझाईन. खालचा काठ तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे काढू शकता. हळदी- कुंकवाचे करंडे आणि तिळगुळाचे लाडू रांगोळीवर अशा पद्धतीने ठेवून द्या. रांगोळी झटपट 5 / 9५. ही रांगोळीही सोपी आणि कमी जागेत काढता येण्यासारखी आहे. यातही पतंगाच्या आतलं डिझाईन तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता6 / 9६. ही रांगोळी तशी सोपी आहे. यात फक्त नथीचा आकार तुम्हाला अगदी परफेक्ट जमला पाहिजे. कारण या रांगोळीचे खरे सौंदर्य आणि नजाकत त्या नथीमध्येच आहे.7 / 9७. रांगोळी काढण्यासाठी खूपच कमी वेळ असेल तर हे डिझाईन काढा. अगदी झटपट खूपच कमी वेळात होणारी ही रांगोळी. पण दिसायला सुरेख आहे. 8 / 9८. पतंगाच्या डिझाईनमध्ये हलवा, विड्याचं पान, हळदी- कुंकवाचे करंडे आणि दोन्ही बाजुंना ठेवलेले दिवे यामुळे या रांगोळीची शोभा नक्कीच वाढली आहे.9 / 9 आणखी वाचा Subscribe to Notifications