1 / 11गुढीपाडवा सण म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. सगळीकडे (Simple Rangoli Designs For Gudi Padwa) दारात गुढी उभारत हा सण अतिशय आनंदात (10 Gudi Padwa Rangoli Ideas) आणि उत्साहात साजरा केला जातो. आपले कोणतेही भारतीय सण रांगोळी शिवाय अधुरेच आहेत. सणावाराला दारांत सुबक - सुंदर रांगोळी हवीच. यंदा पाडव्याला दारात किंवा गुढी भोवती काढता येतील अशा रांगोळी डिझाईन्स पाहूयात. 2 / 11विविध रंगांचा वापर करुन आपण ही गुढीची रंगोळी काढू शकतो. अगदी सोप्या पद्धतीनेही ही रांगोळी काढता येऊ शकते.3 / 11घराबाहेर थोडी मोठी जागा असेल तर अशी थोडी मोठी रांगोळी काढता येऊ शकते. यामध्ये गडद रंग वापरल्यास ही रांगोळी जास्त उठून दिसते.4 / 11जर तुम्हाला रांगोळीचे विविध प्रकार काढता येत असतील तर आपण अशा प्रकारची सुंदर आखीव - रेखीव भरीव अशी रांगोळी काढून छान सजावट करू शकतो. 5 / 11पाडव्याच्या सणाला फुलं, आंब्याची पानं, कडूनिंबाची पानं यांना विशेष महत्त्व असतं. रांगोळीत आपण या सगळ्याचा समावेश केल्यास संस्कृती आणि परंपरेचे दर्शन या रांगोळीतून दिसून येते.6 / 11जर तुम्हाला रांगोळी काढता येत नसेल तर तुम्ही आधी खडूने जमिनीवर हवे तसे चित्र किंवा रांगोळी रेखाटून घ्या त्यानंतर त्यावर पांढऱ्या रांगोळीने बॉर्डर भरून मग आता मनपसंत रंग भरा. 7 / 11गुढी भोवती दिव्यांनी आणि रांगोळीने सजावट केल्यास अधिक चांगला लूक येईल.8 / 11शुभ गुढीपाडवा असा संदेश रांगोळीवर लिहून देखील तुम्ही ही रांगोळी अधिक आकर्षक करु शकता. 9 / 11गुढी, नथ अशा पारंपरिक वस्तू रांगोळी मध्ये रेखाटून तुम्ही तुमची रांगोळी अधिक सुंदर आणि आकर्षक करू शकता. 10 / 11तुम्ही एकाच रांगोळीत अनेक रंगांची उधळण करून देखील अशी विविध रंगी रांगोळी काढू शकता. 11 / 11 जर तुम्हाला अगदी झटपट गुढी पाडव्याची रांगोळी काढायची असेल आणि वेळ कमी असेल तर तुम्ही अशा प्रकारची रांगोळी काढू शकता. यासाठी आवडत्या रंगाची बॅकग्राउंड तयार करून तुम्ही त्यावर अशी एक काठी, कापड आणि तांब्या ठेवून गुढी रांगोळीत देखील गुढी उभारु शकता.