simple tips and tricks for Overflow-free pressure cooking
मस्त देसी जुगाड! शिट्टी होताना कूकरमधून फसफसत पाणी बाहेर येतं? करा 'ही' ट्रिक...Published:October 17, 2024 04:39 PM2024-10-17T16:39:10+5:302024-10-17T18:05:49+5:30Join usJoin usNext स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येकाला बऱ्याचदा असा अनुभव येतो की कुकरमध्ये तुम्ही पुरण किंवा वरण करण्यासाठी डाळ किंवा खिचडी लावली असेल तर शिट्टी होताच कुकरमधलं पाणी बाहेर येतं. त्यामुळे मग कुकरचं झाकण, गॅस असं सगळंच खराब होतं. असं होऊ नये म्हणून शेफ रणवीर बरार यांनी एक सोपा उपाय सांगितला आहे. रणवीर बरार सांगतात कुकरचं झाकण लावण्यापुर्वी शिट्टीला खालून आणि वरून अशा दोन्ही बाजुंनी थोडं तूप लावा. तसेच कुकरमध्ये तुम्ही जो कोणता पदार्थ शिजवायला ठेवला आहे, त्यातही थोडं तूप टाका. यामुळे पाणी अजिबात बाहेर येणार नाही. ही ट्रिक तर कराच पण आणखी एक खास गोष्टही लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही पुरण, डाळ किंवा खिचडी कुकरमध्ये शिजायला ठेवाल तेव्हा झाकण लावण्यापुर्वी गॅस मोठ्या आचेवर ठेवला तरी चालेल. मोठ्या आचेवर त्या पदार्थामधल्या पाण्याला खळखळ उकळी येऊ द्या. त्यानंतर कुकरचं झाकण लावा आणि गॅसची फ्लेम मंद ते मध्यम आचेवरच ठेवा. हा उपायही करून पाहा. शिट्टी झाली तरी थेंबभरही पाणी बाहेर येणार नाही. टॅग्स :किचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नkitchen tipsCooking Tipsfood