1 / 5स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येकाला बऱ्याचदा असा अनुभव येतो की कुकरमध्ये तुम्ही पुरण किंवा वरण करण्यासाठी डाळ किंवा खिचडी लावली असेल तर शिट्टी होताच कुकरमधलं पाणी बाहेर येतं. त्यामुळे मग कुकरचं झाकण, गॅस असं सगळंच खराब होतं.2 / 5असं होऊ नये म्हणून शेफ रणवीर बरार यांनी एक सोपा उपाय सांगितला आहे.3 / 5रणवीर बरार सांगतात कुकरचं झाकण लावण्यापुर्वी शिट्टीला खालून आणि वरून अशा दोन्ही बाजुंनी थोडं तूप लावा. तसेच कुकरमध्ये तुम्ही जो कोणता पदार्थ शिजवायला ठेवला आहे, त्यातही थोडं तूप टाका. यामुळे पाणी अजिबात बाहेर येणार नाही.4 / 5ही ट्रिक तर कराच पण आणखी एक खास गोष्टही लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही पुरण, डाळ किंवा खिचडी कुकरमध्ये शिजायला ठेवाल तेव्हा झाकण लावण्यापुर्वी गॅस मोठ्या आचेवर ठेवला तरी चालेल. मोठ्या आचेवर त्या पदार्थामधल्या पाण्याला खळखळ उकळी येऊ द्या.5 / 5त्यानंतर कुकरचं झाकण लावा आणि गॅसची फ्लेम मंद ते मध्यम आचेवरच ठेवा. हा उपायही करून पाहा. शिट्टी झाली तरी थेंबभरही पाणी बाहेर येणार नाही.