भल्याभल्यांची दांडी उडवणारी ‘लोला कुट्टी’ आली परत! माहिती आहे ती कोण? स्मृती इराणीही स्वागत करत म्हणाल्या..
Updated:January 30, 2024 14:20 IST2024-01-30T14:16:25+5:302024-01-30T14:20:32+5:30
smriti Irani about come back of lola kutty anuradha menon

केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका अभिनेत्रीचा फोटो शेअर केला आणि तिच्याबाबत बरीच चर्चा सुरू झाली.
लोला कुट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव अनुराधा मेनन असून तिला अनु मेनन या नावानेही ओळखले जाते.
या अभिनेत्रीने बरेच वर्षांनी अभिनय क्षेत्रात कमबॅक केले असून त्याचा आनंद स्मृती यांना झाल्याने त्यांनी तो आपल्या सोशल मीडियावरुन व्यक्त केला आहे.
“The most influential influencer influencing influencers influencing an influential generation.”असं कॅप्शन देत त्यांनी तिचे विशेष कौतुक केल्याचे दिसते.
लोला कुट्टी हे एकेकाळी गाजलेले टीव्ही कॅरेक्टर असून तिच्या मल्याळी लूक आणि टोनसाठी ती विशेष प्रसिद्ध आहे.
अनुराधा या स्टँडअप कॉमेडीयन म्हणून प्रसिद्ध असून आवाजाच्या जोरावर त्यांनी अभिनय क्षेत्रात बरेच नाव कमावले आहे.
स्मृती इराणी याही मूळात अभिनेत्री असून आपल्या आवडत्या अभिनेत्रीने कमबॅक केल्याचा आनंद त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.