Join us   

Social Viral : सुपरमार्केटमध्ये मसाला घेत होती महिला अचानक तोंडासमोर आला १० फुटांचा अजगर; अन् मग.....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 7:21 PM

1 / 7
ऑस्ट्रेलियाच्या एका सुपरमार्केटमध्ये हेलॅना अलती नावाची महिला सामान खरेदी करण्यासाठी गेल्यास तिला भयानक प्रसंगाला तोंड द्यावे लागले. (Image Credit- Getty)
2 / 7
सुपरमार्केटमध्ये स्वत:ला हव्या त्या वस्तू घेत असताना ती महिला मसाल्यांच्या सेक्शनमध्ये गेली आणि त्यावेळी तिथं एक मोठा अजगर त्या महिलेच्या समोर आला. (Image Credit- Getty )
3 / 7
३ मीटर लांब साप सिडनीच्या एका दुकानातून समोर आला आणि लोकांमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. (Image Credit- Getty )
4 / 7
महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, ''मी त्या रात्री चिकन बनवण्यासाठी मसाला घ्यायला सुपरमार्केटमध्ये गेले होते. मसाला घेतल्यानंतर मी डाव्या बाजूला पाहिलं तेव्हा माझ्या तोंडासमोर मोठा अजगर आला.'' (Image Credit- AP)
5 / 7
योगायोगानं या महिलेनं आधीच साप पकडण्याचं प्रक्षिक्षण घेतलं होतं. म्हणून सापाला बघितल्यानंतर ही महीला फारशी घाबरली नाही तर तिनं त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. फक्त सुरूवातीला भीती वाटली कारण मसाल्यांच्या बरण्यांच्या मागे असं काही दडलं असेल याची कल्पनाही तिनं केली नव्हती. (Image Credit- Getty)
6 / 7
सुपरमार्केट चेन वूलवर्थ्सनं दिलेल्या माहितीनुसार सिडनीच्या उत्तर पश्चिमी परिसरातील उपनगरात सुपरमार्केटमध्ये अजगर आढळला. मसाल्यांच्या बरण्यांमागे हा अजगर लपला होता.
7 / 7
अजगर असल्याची माहिती मिळताच सर्व स्टाफ आणि ग्राहकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आणि सुपरमार्केट बंद केले. अजगर सुपरमार्केटमध्ये कसा शिरला असावा याबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही.
टॅग्स : सामाजिकसोशल व्हायरलजरा हटकेसाप