Join us   

Social Viral : आश्चर्य! महिलेच्या शरीरात होते २ प्रायव्हेट पार्ट्स; लग्न झालं तरी माहीत नव्हतं, अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 5:54 PM

1 / 8
अमेरिकेच्या उत्तर कैरोलिनातील रहिवासी असलेल्या २६ वर्षीय ब्रिटनी जॅकब्स या महिलेनं आपल्या शारीरिक स्थितीबाबत मोठा खुलासा केला आहे. जेव्हा या महिलेनं आपल्या बाळाला जन्म दिला तेव्हा तिला कळलं की तिच्या शरीरात दोन योनी मार्ग आणि गर्भाशय आहेत. विशेष म्हणजे स्वतःच्या शरीरातील या वेगळेपणाबाबत या महिलेला मुलाच्या जन्माच्यावेळी माहिती मिळाली.
2 / 8
ब्रिटनीला मागच्यावर्षी या स्थितीबाबत माहिती मिळाली होती. त्यावेळी ती गर्भवती होती आणि तिला आपल्या मुलाची नैसर्गिकरित्या गर्भधारणा हवी होती. पण हे खूपच त्रासदायक ठरणार होतं. ब्रिटनीला ही समस्या तिच्या योनी मार्गातील सेप्टममुळे उद्भवत होती. सेप्टममुळे योनी २ भागात विभागली गेली.
3 / 8
कोणत्याही महिलेच्या शरीरात दोन योनी असतील तर त्याला वैद्यकिय परिभाषेत uterine didelphys असं म्हणतात. ही एक दुर्मिळ स्थिती आहे. अमेरिकेत १ टक्क्यांपेक्षा कमी महिलांमध्ये या प्रकारची स्थिती दिसून येते. याव्यतिरिक्त ब्रिटनीला आपल्या पतीसह संबंध ठेवतानाही वेदनांचा सामना करावा लागत होता.
4 / 8
ब्रिटनीनं सांगितले की, ''मला शरीरसंबंधादरम्यान वेदना जाणवत असल्याची तक्रार घेऊन डॉक्टरांकडे अनेकदा गेले पण त्यांनी माझ्या या समस्येकडे फारसं लक्ष दिलं नाही. संबंध ठेवण्याआधी शरीर रिलॅक्स ठेवावं, असा सल्ला दिला. पण मला काहीतरी गंभीर समस्या असावी असं जाणवत होतं.''
5 / 8
साधारणपणे uterine didelphys या स्थितीबाबत महिलांना तोपर्यंत माहित माहिती होत नाही जोपर्यंत त्यांना वेदना किंवा मासिक पाळीदरम्यान त्रास होत नाही. याऊलट अनेक महिलांना या स्थितीत जराही वेदना किंवा लक्षणं जाणवत नाहीत.
6 / 8
ब्रिटनीनं आपल्या या स्थितीबाबत टिकटॉक व्हिडीओजसुद्धा बनवले आहेत. तिला नेहमीच लोकांमध्ये जागरूकता पसरवणं आवडतं.
7 / 8
ब्रिटनीनं सांगितलं की, ''एका व्यक्तीनं मला सांगितलं होतं की या स्थितीत सर्जरीदरम्यान त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला होता.
8 / 8
त्यानंतर त्यांच्या बाळाचाही मृत्यू झाला. हे कळल्यानंतर मला खूप दुःख झालं. या दुर्मिळ स्थितीमुळे एखाद्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागू शकतो याचं वाईट वाटलं.'' (All Image Credit- Social media, aajtak)
टॅग्स : सोशल व्हायरलहेल्थ टिप्सआरोग्य