South Actress Without Makeup : रश्मिकापासून नयनतारापर्यंत मेकअपशिवाय कशा दिसतात साऊथच्या ९ अभिनेत्री? - पाहा फोटो
Updated:July 4, 2022 16:30 IST2022-07-04T15:26:18+5:302022-07-04T16:30:39+5:30
South Actress Without Makeup Photos : अभिनेत्री रश्मिका नो मेकअप लूकमध्येही तितकीच सुंदर दिसते.

मोठ्या पडद्यावरील अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून अनेकांना भूरळ पडते. या अभिनेत्री आपल्या वैयक्तीक आयुष्यात कशा राहतात, रोजचं आयुष्य जगताना कशा वावरतात, कशा दिसतात. याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. (South Actress Without Makeup Photos) काही अभिनेत्री पडद्यावर जितक्या सुंदर दिसतात तितक्याच त्या नो मेकअप लूकमध्येही सुंदर, आकर्षक दिसतात. तर काहींना मेकअपशिवाय ओळखणंही कठीण होतं. या लेखात तुम्हाला प्रसिद्ध दक्षिण भारतीय अभिनेत्रींचे नो मेकअप लूक दाखवणार आहोत. (Latest Picture Of South Indian Actress Without Makeup)
रश्मिका मंदाना
खूप कमी वयातच नॅशल क्रश बनलेल्या रश्मिकानं चित्रपत्रसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मिशन मजनू चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एंट्री करत असलेली अभिनेत्री रश्मिका नो मेकअप लूकमध्येही तितकीच सुंदर दिसते.
अनुष्का शेट्टी
बाहुबली चित्रपटातील देवसेनेच्या भूमिकेतील अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा नो मेकअप लूक पाहिल्यानंतर तुम्ही तिला ओळखूही शकणार नाही. मेकअप नसला तरी अनुष्काचे स्मित हास्य चाहत्यांच्या मनावर वेगळीच छाप पाडते.
समंथा रूथप्रभू
समंथा तिचा घटस्फोट आणि पुष्पा चित्रपटातील आयटम सॉन्गमुळे प्रचंड चर्चेत होती. टॉलिवूड अभिनेत्री समंथा रुथ प्रभू देखील चित्रपटांमध्ये खूपच कमी मेकअप करते. तिचे मेकअपशिवायचे फोटोही चाहत्यांनी पाहिले आहेत. या अतिशय सुंदर अभिनेत्रीला मेकअपची गरज नाही. असं दिसून येतं.
तमन्ना भाटीया
बाहुबली फेम प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटीयाने हिंदी चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तमन्ना लोक मेकअप लूकमध्येही तितकीच सुंदर दिसते.
साई पल्लवी
2 कोटींच्या फेअरनेस क्रीमची जाहिरात करण्यास नकार दिल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या साई पल्लवीचा विश्वास आहे की लोक साधेपणाला जास्त महत्त्व देतात. पल्लवीला तिचा चेहरा जसा आहे तसा मांडायला आवडते. ती जास्त मेकअपवर विश्वास ठेवत नाही आणि म्हणूनच ती सिनेप्रेमींमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. साईने अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे.
नयनथारा
अभिनेत्री नयनतारा अनेकवेळा नो मेकअप लूकमध्ये आउटिंग करताना पाहायला मिळते. तिच्या मेकअप आणि विदाऊट मेकअप लूकमध्ये खूपच फरक पाहायला मिळतो. तरीसुद्धा ती आपल्या अभियन कौशल्यामुळे चाहत्यांमध्ये फार प्रसिद्ध आहे.
प्रिया वॉरिअर
चित्रपटात डोळे मारण्याच्या दृश्यावरून प्रेक्षकांच्या पसंतीत उतरलेली प्रिया वॉरियर रातोरात स्टार बनली होती. प्रियाला बिना मेकअप पाहून तिला ओळखणे देखील खूप कठीण आहे.