Join us   

जन्माष्टमी सोहळ्याचा देखावा कसा करावा समजेना? बघा काही खास टिप्स आणि सजवा तुमचा लड्डूगोपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2022 6:53 PM

1 / 9
श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्ण भक्तांसाठी एक आनंदाचा, उत्साहाचा दिवस. यादिवशी आपल्या घरातल्या प्रथा- परंपरा यानुसार श्रीकृष्णाची पूजा तर करतातच, पण त्यासोबतच अधिक उत्साहाचा भाग असतो, तो त्या दिवशीचा खास देखावा..
2 / 9
गणपती, महालक्ष्मी, चैत्रगौर या सणांमध्ये डेकोरेशनला जसं महत्त्व असतं, तसंच महत्त्व श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या देखाव्यालाही असतं. अनेक घरांमध्ये यादिवशी मातीने गोकूळ उभं केलं जातं. पण आता नवनविन कल्पना वापरून जन्माष्टमीचा देखावा अधिक आकर्षक केला जातो. यादिवशी गोकुळाष्टमीला काय थीम करावी किंवा डेकोरेशन कसं करावं, हे सुचत नसेल, तर हे काही फोटो बघा.. नक्कीच डेकोरेशनच्या छान आयडिया मिळतील.
3 / 9
हा एक साधा- सोपा देखावा.. जाड कागद वापरून तयार केलेलं झाड आणि त्याभोवती आर्टिफिशीयल ग्रास आणि शोभेची झाडं वापरून केलेला देखावा.. पाण्याचा सीन करायचा असल्यास खाली आरसा ठेवून त्याभोवती असे दगड, शोभेची झाडंही ठेवू शकता.
4 / 9
डेकोरेशनसाठी कमी जागा असेल तर कृष्णाच्या पाळण्याभोवती कमान आणि पाळण्याला डेकोरेशन असंही सुटसुटीत करू शकता.
5 / 9
भरपूर जागा असेल आणि पुरेसा वेळही असेल तर असं मस्त गोकूळ मांडू शकता. अशा बाहुल्या रेडीमेड आणल्या तर त्या मांडून अशा पद्धतीने सजावट करायला फार काही वेळ लागणार नाही.
6 / 9
मोठ्या जागेत करण्यासाठी हा आणखी एक देखावा. यातही सगळ्या रेडिमेड वस्तू वापरल्या आहेत. फक्त त्या मांडण्यात कल्पकता वापरल्याने देखावा आकर्षक दिसतो आहे.
7 / 9
कमी जागेत करता येण्यासारखा हा आणखी एक देखावा. यासाठी मात्र मोरपिस भरपूर लागतील. खूप जागा नसेल तर अशा पद्धतीने पाळण्याला सजावट करूनही छान देखावा करता येतो.
8 / 9
गोवर्धन पर्वत आणि त्या पर्वतावरून येणाऱ्या दही- दुधाच्या राशी हा एक अतिशय सुंदर देखावा... कापूस वापरून दही- दूध दाखवलं आहे, तसंच आजुबाजूला सगळ्या गवळणींच्या मुर्ती, प्राणी ठेवले आहेत. डोंगर तयार करण्यासाठी एक सोपी आयडिया म्हणजे खोके किंवा डबे एकावर एक ठेवा. त्यावर जाड हार्ड शीट टाका. हार्डशीटवर फेवीकॉल पसरवा आणि त्यावर गवत किंवा माती तुम्हाला जे काही टाकायचे असेल ते दाट टाका.. झाला डोंगर तयार.
9 / 9
हा एक झटपट होणारा साधा- सुटसुटीत देखावा. अशा पद्धतीची चौकट घरी उपलब्ध असेल तर तो सहजपणे करता येईल. फोटोमध्ये जे लटकवलेलं दिसत आहे, तेच लटकविण्याची गरज नाही. तुम्ही त्याऐवजी छोटे दिवे, फुलं, मणी असं काहीही वापरू शकता.
टॅग्स : सोशल व्हायरलजन्माष्टमी