Join us

समर फॅशन : उन्हाळ्यात नेसा कॉटनच्या हलक्याफुलक्या ६ साड्या, दिसतात सुंदर आणि कमाल स्टायलिश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2025 13:56 IST

1 / 10
पूर्वी कॉटनच्या साड्या रोजच्या वापरासाठी वापरल्या जायच्या. घरामध्ये वावरताना कम्फर्टेबल वाटावे म्हणून कॉटनची साडी असायची.
2 / 10
पण सध्या कॉटनची साडी ट्रेडिशनल वेअर म्हणून ट्रेंडमध्ये आहे. सिंपल पेहराव करूनही ही साडी फार रीच लूक देते.
3 / 10
सणा-समारंभात नुसती घाई गडबड असते. तसेच सतत कामं सुरू असतात. अशावेळी कॉटनची साडी उत्तम. फक्त सांभाळायला सोपी नाही तर, खुपच सुंदर दिसते.
4 / 10
सध्या कोणत्या प्रकारच्या कॉटनच्या साड्यांना बाजारात मागणी आहे ते जाणून घ्या. येत्या सणांसाठी कॉटनच्या साडीचा ट्रेंड नक्की फॉलो करा.
5 / 10
१. सगळ्यात जास्त 'सिंपल प्लेन' कॉटनच्या साडीचा वापर तरुण मुली करतात. त्यावरती साधीशी ज्वेलरी फारच छान दिसते.
6 / 10
२. कॉटनचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि कॉटनची साडी हे कॉम्बीनेशन फारच चर्चेत आहे. काही तरी वेगळं ट्राय करायचे असल्यास हा चांगला पर्याय आहे.
7 / 10
३. 'मलमल कॉटन' साडी हा प्रकारही महिलांच्या पसंतीस पडलेला आहे. ऑफिसला जाणाऱ्या महिला हा प्रकार वापरताना दिसतात.
8 / 10
4. 'कलमकारी' हा प्रकारच मुळात फार गाजला आहे. कुर्ते, ड्रेस, पॅन्ट सगळ्याच प्रकारात कलमकारी वापरले जात आहे. त्याच बरोबर कलमकारी साडीही महिलांना फार क्लासी वाटते.
9 / 10
५. 'मंगलागिरी साडी' हा प्रकारही फार सुंदर आहे. अगदी हलकी, साधी, प्लेन असा साडीचा प्रकार आहे. त्यावर कॉटन प्रिंटेड ब्लाईज असतो. ब्लाऊजमुळेच ही साडी फार उठून दिसते.
10 / 10
६. सध्या महिलांना विशेषत: तरुणींना 'फ्लोरल कॉटन’ साडी फार आवडते. सर्व प्रकारच्या फेंट रंगांच्या या साड्या दिसतातही सुंदर
टॅग्स : साडी नेसणेकापूसमहिलाभारतसोशल मीडिया