1 / 8१९ सप्टेंबर १९६५ साली अमेरिकेच्या ओहियामध्ये सुनिता विल्यम्सचा जन्म झाला.सुनिता विल्यम्स या भारतीय वंशाच्या अमेरिकन नौसेनेतील अधिकारी आणि नासा अंतराळयात्री आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या १४ व्या आणि १५ व्या मोहिमेवर पाठवण्यात आले. 2 / 8वय वाढते तसं स्वप्न देखील बदलतात असेच काहीस सुनिता सोबत झालं. वैद्यकीय शिक्षणाकडे ओढ वाढत गेली आणि आपण प्राण्याचे डॉक्टर व्हावे असे त्यांना वाटू लागले. हवं ते कॉलेज न मिळाल्यामुळे अॅडमिशन झालं नाही. 3 / 8सुनिता विल्यम्स यांचा जन्म युक्लिड ओहिओ येथे झाला. वडील भारतीय -अमेरिकन न्यूरोअँटोमिस्ट दीपक पंड्या तर आई स्लोव्हिन-अमेरिकन उर्सुलिन बोनी पंड्या आहेत. 4 / 8सुनीता विल्यम्स तिच्या तीन भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. सुनीता विल्यम्सचा भाऊ जे थॉमस तिच्यापेक्षा चार वर्षांनी मोठा आहे आणि बहीण दिना अन्नाध तिच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे.5 / 8सुनिता विल्यम्सच्या पतीचे नाव मायकेल जे विल्यम्स आहे. लग्नाला २० वर्ष झाली असून मायकेल प्रसिद्धीपासून दूर राहातो. मायकल हे अमेरिकन मार्शल म्हणून काम करतात. 6 / 8सुनीता विल्यम्स आणि मायकेल यांची पहिली भेट १९८७ मध्ये मेरीलँडमधील अॅनापोलिस येथील नेव्हल अकादमीमध्ये झाली.त्यांच्या मैत्रीचे हळूहळू प्रेमात रुपातंर झाले आणि त्यांनी लग्न केले. 7 / 8अंतराळ मोहिमांमध्ये, सुनीता विल्यम्स यांनी त्यांचे पवित्र हिंदू ग्रंथ श्रीमद्भगवद्गीता, ओमचे प्रतीक आणि भगवान शिवाचे चित्र देखील सोबत नेले आहे.8 / 8सुनिता विल्यम्सला मुले नाहीत, यापूर्वी अहमदाबादमधील एका मुलाला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. जॅक रसेल टेरियर पाळीव कुत्रा गोर्बी नावाचा होता, जो नॅशनल जिओग्राफिक शो डॉग व्हिस्पररमध्ये दिसला होता.