फक्त १० रूपयांचं मीठ वापरून घरातली ६ कामं करा झटपट, बघा मिठाचा स्मार्ट-सोपा वापर By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 1:53 PM 1 / 7मिठाचा वापर स्वयंपाकाच्या अनेक कामांसाठी केला जातो. मिठाशिवाय जेवणाला चव नाही असं म्हटलं जातं. मीठाचा वापर करून फक्त स्वयंपाक नाही तर घरातील इतर कामही तुम्ही सोपी करू शकता. (Salt Uses and Tips) साफसफाईच्या अनेक कामांसाठी मीठ वापरता येतं. (Home Hacks) फक्त १० रूपयांचं मीठ वापरून तुम्ही घरातील कोणकोणती काम करू शकता याबद्दल समजून घ्या. (Household Uses of Salt uses of salt at home)2 / 7कपड्यांवर जर हट्टी डाग असतील तर ते वारंवार वॉशिंग मशीनमध्ये धुवूनही निघत नाहीत. अशावेळी तुम्ही कपडे धुण्यासाठी मिठाचा वापर करू शकता. पाण्यातमीठ टाकल्यानंतर काही मिनिटे थांबा. त्यानंतर कपडे त्या पाण्यानं मग साध्या पाण्याने आणि डिटर्जंटने धुवा. लक्षात ठेवा मीठ देखील कापड खराब करू शकते, म्हणून मीठात कपडे जास्तवेळ भिजवून ठेवू नका. 3 / 7फ्रीज साफ करणे देखील डोकेदुखी आहे आणि अस्वच्छ फ्रिजमुळे अनेकदा दुर्गंध येतो. अशा परिस्थितीत, कोमट पाण्यात १/२ कप मीठ घालून त्यात कापड बुडवून तुम्ही रेफ्रिजरेटरचे शेल्फ पुसून टाकू शकता. असे केल्याने त्याचा वासही येणार नाही.4 / 7आपण मीठ वापरून लाकडी फर्निचरवरील पाण्याचे डाग देखील काढू शकता. यासाठी 1 चमचा मीठामध्ये पाण्याचे काही थेंब घाला आणि ते फक्त काही थेंब असले पाहिजे कारण मीठ खूप लवकर विरघळेल. यानंतर कापडात पेस्टसारखे मीठ लावून फर्निचर पुसून टाका. हे लक्षात ठेवा की ते हलक्या हातांनी केले पाहिजे जेणेकरून फर्निचरची पॉलिश खराब होणार नाही.5 / 7बुटांना येणारा घाणेरडा वास मिठाच्या मदतीनं काढता येऊ शकतो. हा हॅक कापड किंवा कॅनव्हास शूजवर काम करेल. यासाठी शूजच्या आत थोडे मीठ शिंपडा. मीठाने शूजचा वास कमी होईल. नंतर पुन्हा ओल्या कापडाने पुसून टाकू शकता. असे केल्याने शूजचा वास दूर होईल, परंतु येथे हे देखील लक्षात ठेवा की मीठ जास्त वेळ बुटांवर ठेवू नयेत.6 / 7एप्सम सॉल्टचा वापर खत म्हणूनही केला जाऊ शकतो. यासाठी फक्त एप्सम मीठ वापरा कारण सामान्य मीठामुळे रोपांना इजा होऊ शकते. 2 लिटर पाण्यात थोडे मीठ मिसळा आणि झाडांवर फवारणी करा. मॅग्नेशियममुळे ते वनस्पतींसाठी खूप चांगले सिद्ध होऊ शकते.7 / 7मिठाच्या साहाय्याने घरातील कोणत्याही वस्तू स्वच्छ करू शकता. यासाठी तुम्ही काही पाण्यात मीठ विरघळवून ते पाणी कापडाच्या साहाय्याने वस्तूंवर लावू शकता. बॅक्टेरिया मारण्यासाठी मीठ खूप उपयुक्त ठरू शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications