Join us

Sushmita Sen Heart Attack : एखाद्या दिवशी मला काही झालं तर? कायम हिमतीने जगणाऱ्या सुश्मिता सेनला असं का वाटत होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 18:27 IST

1 / 8
सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. खुद्द सुष्मिताने सोशल मीडियावर पोस्ट करत आपली ॲन्जिओप्लास्टी झाली, स्टेंट टाकला अशी माहिती दिली. तिला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता, परंतु आता ती ठीक आहे. (Sushmita Sen suffers a heart attack)
2 / 8
अर्थातच ही बातमी कळल्यावर सगळ्यांना धक्का बसला. अतिशय फिट असलेली, आनंदी जगण्याचा प्रयत्न करणारी सुश्मितालाही हार्ट ॲटॅक येतो ही बातमी धक्कादायक होतीच.
3 / 8
सुश्मिताने वडिलांसोबतचा एक हसरा फोटो शेअर केला आहे. त्यात ती म्हणते माझे बाबा म्हणत, तुझं मन एकदम प्रसन्न ठेव, धाडसही सांभाळ. जेव्हा तुला गरज असेल तेव्हा तेच तुझ्यासोबत असेल. मी आता बरी आहे असं सुश्मिता सांगते. माझे डॉक्टरही म्हणतात, तुझं हार्ट मोठ्ठं आहे असं म्हणत त्यातही ती विनोद करतेय.
4 / 8
गेले काही दिवस तिला बरं नव्हतंच. पिंक व्हिलाला अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती की, मला बरं नाहीये.
5 / 8
. केसही फार गळतात. चेहऱ्यावर जास्त चरबी साठली आहे.औषधं घेतेय पण कधीकधी वाटतं यात माझं काही बरंवाईट झालंच तर..
6 / 8
२०२० मध्ये अनुपमा चोप्राला दिलेल्या मुलाखतीतही ती म्हणाली होती की गेली १० वर्षे फार चढउतार झाले.
7 / 8
मुली मोठ्या होताना पाहणं फार आनंदाचं होतं पण त्यानंतर मात्र मला निराशेच्या काळोखाने घेरलं. पण कधीतरी हे सरेल आनंदाचा, उमेदीचा किरण दिसेल याची मला खात्री होती.
8 / 8
सुश्मिताने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. तिच्या कायम बदलत्या बॉयफ्रेण्ड्सची चर्चा होते पण हिमतीने जगणारी सुश्मिता मात्र साऱ्यावर मात करत आपल्या मर्जीने आयुष्याकडे आशेनं पाहत असते.
टॅग्स : सोशल व्हायरलसुश्मिता सेनहृदयविकाराचा झटकाहृदयरोग