'अनुपमा'च्या गोष्टीत 'असं' काय आहे, महिलाच नाही पुरुषही झाले दिवाने? 'अनुपमा'सारखं खरंच जगता येईल तुम्हाला.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 1:03 PM 1 / 7२०२१ या वर्षी टिआरपीच्या बाबतीत अनुपमा ही मालिका कायमच अव्वल होती.. एवढेच काय पण बिगबॉस सिझनमध्येही मालिकेने तिची लोकप्रियता टिकवून ठेवली आणि टिआरपीच्या बाबतीतले पहिले स्थान कायम ठेवले होते. २०२० पासून ही मालिका सुरू झाली. तेव्हापासून काही तुरळक अपवाद वगळता आजपर्यंत 'अनुपमा' कायमच नंबर वन ठरली आहे. 2 / 7म्हणूनच तर यावर्षी नुकत्याच मुंबई येथे झालेल्या Dadasaheb Phalke International Film Festival Awards- 2022 या पुरस्कार सोहळ्यात अनुपमाने आपली खणखणीत मोहोर उमटवली असून दोन पुरस्कार मिळविले आहेत. 3 / 7यावर्षी या मालिकेला टेलिव्हिजन सिरिज ऑफ दि ईयर हा पुरस्कार मिळाला असून मालिकेतील अनुपमा म्हणजेच अभिनेत्री रुपाली गांगुली हिला मोस्ट प्रोमिसिंग ॲक्ट्रेस इन टेलिव्हिजन सिरिज हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 4 / 7मालिकेचं हे घवघवीत यश पाहिलं की इतर मालिकांपेक्षा काय तिच्यात वेगळं असा प्रश्न नक्कीच पडतो. याच मालिकेची कथा घेऊन मराठीत सुरू झालेली अरूंधती ही मालिकाही मराठी रसिकांचं भरभरून प्रेम मिळवते आहे.. म्हणूनच तर नेमकी काय जादू या मालिकेत आहे, हे शोधण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो.5 / 7अहमदाबादला (Ahmadabad) राहणाऱ्या उच्च मध्यमवर्गीय गटात मोडणाऱ्या शहा या गुजराती परिवाराची ही कहानी आणि अभिनेत्री रूपाली गांगुली म्हणजे या मालिकेची अनुपमा. वनराज, काव्या आणि आता अनुज या पात्रांभोवती फिरणारे अनुपमाचे कथानक..6 / 7पंचविशीच्या आत- बाहेरचे हिरो- हिरोईन आणि त्यांचं कोवळ प्रेम.. असं काहीही या मालिकेत नाही. या मालिकेतले अनुपमा- वनराज हे जोडपे मध्यम वयातले. त्यांना एक सून आली आहे. तरीही या वयातला त्यांचा घटस्फोट, त्यानंतर वनराजचं दुसरं लग्न. अनुपमाच्या आयुष्यात आलेला अनुज आणि आता फुललेली त्यांची लव्हस्टोरी असा सगळा मिडल एज रोमान्स या मालिकेचं वेगळेपण ठरला आहे. 7 / 7आजवर फक्त नवरा, घर, चुल- मुल एवढंच तुम्ही सांभाळलं असलं तरी चाळिशीनंतरही तुम्ही तुमच्या करिअरला सुरूवात करू शकता आणि तुमचं ध्येय गाठू शकता, असा संदेश या मालिकेतून महिलांना देण्यात येत आहे. कितीही अवघड प्रसंग आला तरी आयुष्याकडे अतिशय सकारात्मकतेने पाहण्याचा अनुपमाचा दृष्टीकोन सगळ्यांनाच आवडतोय. आणखी वाचा Subscribe to Notifications