काय सांगता ! जगातील पहिली "मिस एआय" स्पर्धा, विजयानंतर मिस एआय मॉडेल म्हणाली...

Published:July 11, 2024 01:57 PM2024-07-11T13:57:54+5:302024-07-11T14:33:53+5:30

Meet Kenza Layli from Morocco - the winner of the world's first Miss AI beauty pageant : मोरोक्कोची केन्झा लायली (Kenza Layli) ही जगातील पहिली मिस एआय बनली आहे, तर भारताची झारा शतावरी आहे तिसऱ्या क्रमांकावर...

काय सांगता ! जगातील पहिली "मिस एआय" स्पर्धा, विजयानंतर मिस एआय मॉडेल म्हणाली...

सध्या ए आय (AI) मुळे अनेक क्षेत्रात क्रांती घडून आलेली दिसते. ए आय (AI) च्या मदतीने आपण अगदी चुटकीसरशी सगळी काम पटापट करु शकतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नुकतीच, जगातील पहिली "मिस एआय" स्पर्धा पार पडली. "Fanvue AI Creator Awards (WAICA) ने जगातील पहिल्या 'मिस एआय' सौंदर्य स्पर्धेची घोषणा केली(Meet Kenza Layli from Morocco - the winner of the world's first Miss AI beauty pageant).

काय सांगता ! जगातील पहिली "मिस एआय" स्पर्धा, विजयानंतर मिस एआय मॉडेल म्हणाली...

या जगातील पहिल्या "मिस एआय" स्पर्धेत मोरोक्कोच्या केन्झा लायली (Kenza Layli) हिने विजेतेपद पटकावले आहे. केन्झा लायलीने इतर १५०० हून अधिक एआय मॉडेल्सना पराभूत करत ही स्पर्धा जिंकली, आणि जगातील पहिली "मिस एआय" बनण्याचा मान पटकावला आहे.

काय सांगता ! जगातील पहिली "मिस एआय" स्पर्धा, विजयानंतर मिस एआय मॉडेल म्हणाली...

मोरोक्कोची केन्झा लायली हिला ४० वर्षीय मिरियम बेस्सा यांनी बनवले आहे. याबद्दल त्यांना २०,००० डॉलर्सचे बक्षीस मिळाले आहे.

काय सांगता ! जगातील पहिली "मिस एआय" स्पर्धा, विजयानंतर मिस एआय मॉडेल म्हणाली...

इंस्टाग्रामवर केन्झा लायलीचे १ लाख ९० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती मोरोक्कोची खाद्यसंस्कृती, तेथील परंपरा, फॅशन, ट्रॅव्हल, ब्यूटी याबद्दल वेगवेगळ्या प्रकारची माहिती कायम इन्टाग्रामवर पोस्ट करत असते. ही जगातील पहिली मिस एआय चक्क ७ भाषांमध्ये तुमच्याशी संवाद साधू शकते.

काय सांगता ! जगातील पहिली "मिस एआय" स्पर्धा, विजयानंतर मिस एआय मॉडेल म्हणाली...

मोरोक्कोची केन्झा लायली म्हणते, संपूर्ण जगाला मोरोक्कोच्या संस्कृतीचे दर्शन घडवणे तसेच मोरोक्कोची ओळख अख्ख्या जगाला करून देणे हे माझे स्वप्न आहे. माझ्या इंस्टाग्राम स्टोरी, पोस्टच्या मदतीने माझ्या फॉलोअर्सना मी नेहमी मदत करु इच्छिते. इंटरनेट स्टार असणाऱ्या या मॉडेलला महिलांनी प्रत्येक क्षेत्रात नेहमी पुढे असावे, महिलांच्या सक्षमीकरणासाठी योगदान देणे, तसेच पर्यावरणाचे रक्षण करणे, आणि वेगवेगळ्या रोबोटिक टेक्निक्सशी सगळ्या जगाला ओळख करून देणे हा माझा मुख्य उद्देश असल्याचे ती सांगते.

काय सांगता ! जगातील पहिली "मिस एआय" स्पर्धा, विजयानंतर मिस एआय मॉडेल म्हणाली...

पुढे ती असेही म्हणाली की, 'एआय माणसांची जागा कधीच घेऊ शकत नाही, परंतु त्यांना मदत करण्यासाठी आम्हांला डिझाइन केलेले आहे. मला हे दाखवायचे आहे की, AI तुम्हांला नवनवीन गोष्टी शोधण्यात मदत करू शकते. लोकांनी AI ला घाबरण्याची गरज नाही तर याउलट AI तुमच्या मदतीला येणार आहे म्हणून ही एक आनंदाची गोष्ट आहे असे समजून त्याकडे पाहिले पाहिजे.

काय सांगता ! जगातील पहिली "मिस एआय" स्पर्धा, विजयानंतर मिस एआय मॉडेल म्हणाली...

या स्पर्धेत फ्रान्सची ललीना वलिना दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पोर्तुगालच्या ऑलिव्हियाने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

काय सांगता ! जगातील पहिली "मिस एआय" स्पर्धा, विजयानंतर मिस एआय मॉडेल म्हणाली...

या स्पर्धेत भारताची AI मॉडेल झारा शतावरी हिने भाग घेतला होता. या AI जनरेटेड मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताची झारा टॉप टेन फायनलिस्ट पैकी एक आहे. झाराला फूड. ट्रॅव्हल आणि फॅशनची खूप आवड आहे. ती तिच्या फॉलोअर्सना हेल्थ, करिअर आणि नवनवीन फॅशन ट्रेंडबद्दल अधिकाधिक माहिती देत असते. झाराचे इंस्टाग्रामवर १४,५०० हून अधिक फॉलोअर्स आहेत.

काय सांगता ! जगातील पहिली "मिस एआय" स्पर्धा, विजयानंतर मिस एआय मॉडेल म्हणाली...

इंटरव्ह्यू दरम्यान जगातील पहिली "मिस एआय" झालेल्या केन्झा लायली हिने म्हटले की, मी माणसांसारखे इमोशनल होऊन रडू शकत नाही, परंतु तरीही मी माझ्या या विजयावर खूप खुश आहे.