Women's Day 2025 : तुम्ही काय गिफ्ट द्याल स्वत:ला महिला दिन म्हणून? ‘हे’ गिफ्ट द्या, आयुष्य बदलून जाईल..
Updated:March 8, 2025 08:40 IST2025-03-08T08:35:22+5:302025-03-08T08:40:01+5:30
This Women's Day Gift Something To Yourself : या महिला दिनाला स्वतःला काय द्याल? हे वाचा. मग समजेल तुम्हाला कशाची गरज आहे ते.

महिला दिनाच्या शुभेच्छा तर सगळेच देतील. तुमच्या जवळचे लोक तुम्हाला विविध भेटवस्तू देतीलच. पण तुम्ही स्वत:ला काय भेट वस्तू द्याल?
महिला एकाच व्यक्तीकडे सातत्याने दुर्लक्ष करतात. ती व्यक्ती म्हणजे ती महिला स्वत:च. इतरांचे आयुष्य सोयीस्कर करण्याच्या नादात स्वत:ला विसरूनच जातात.
पण या महिला दिनाला असे करू नका. स्वत:ला स्वत:कडूनच काही तरी भेट द्या. मग वस्तू असेल किंवा विचार. असे काय देऊ शकता?
महिलांना आनंदी राहण्यासाठी कोणत्या आलिशान वस्तूंची गरज नसते. तर साध्या काही किरकोळ वाटणाऱ्या गोष्टींची गरज असते. त्या तुम्हाला पुरवण्यात जर समाज कमी पडतो आहे, तर त्या तुम्हीच स्वत:ला द्या.
जसं की 'झोप'. महिलांचा दिवस कधी सुरू होतो, कधी संपतो त्यांचं त्यांनाच कळतच नाही. स्वत:च्या मानसिक शांततेसाठी स्वत:ला काही आरामाचे क्षण भेट म्हणून द्या. जरा झोपेकडे लक्ष द्या.
महिलांनी स्वत:मध्ये बिंबवली पाहिजे अशी गोष्ट म्हणजे 'आत्मसन्मान'. महिला कायम स्वत:च्या स्वाभिमानाला तडा जाऊ देतात. तसे न करता, स्वत:ची बाजू मांडायला शिका.
स्वत:ला जरा 'वेळ' गिफ्ट करा. तुमचा छंद शेवटचा कधी जोपासला होतात आठवत नाही आहे ना कारण तो तुम्ही मागे सोडून आलात. तो छंद जोपासण्यासाठी वेळ काढा. वेळ काढला की नक्कीच मिळतो.
महिलांसाठी गरजेचे आहे ते म्हणजे 'आर्थिक स्वातंत्र्य'. एखादा लहान का होईना व्यवसाय करावा. स्वत:चे चार पैसे प्रत्येक महिलेने कमवलेच पाहिजेत.
या महिला दिनाला स्वत:ला एखादं 'यंत्र' गिफ्ट करा. जे तुमचे काम सोपे करेल. घरच्यांना पाट्यावरची चटणी आवडते म्हणून मिक्सर वापरत नाही. अशा अनेक महिला आहेत. स्वत:चे काम सोपे कसे होईल याची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे.
जर टॉक्सिक वातावरणात राहत आहात. तर स्वत:ला त्या वातावरणापासून 'स्वातंत्र्य' गिफ्ट करा. मन मारून कुडत जगू नका. जग बदलले आहे.आता विचार बदलले पाहिजेत.
विकतच्या भेटवस्तू आपल्याला इतरही लोक देतात. पण या काही गोष्टी आहेत ज्या फक्त तुम्हीच स्वत:ला देऊ शकता. नक्कीच विचार करा.