1 / 11महिला दिनाच्या शुभेच्छा तर सगळेच देतील. तुमच्या जवळचे लोक तुम्हाला विविध भेटवस्तू देतीलच. पण तुम्ही स्वत:ला काय भेट वस्तू द्याल?2 / 11महिला एकाच व्यक्तीकडे सातत्याने दुर्लक्ष करतात. ती व्यक्ती म्हणजे ती महिला स्वत:च. इतरांचे आयुष्य सोयीस्कर करण्याच्या नादात स्वत:ला विसरूनच जातात.3 / 11पण या महिला दिनाला असे करू नका. स्वत:ला स्वत:कडूनच काही तरी भेट द्या. मग वस्तू असेल किंवा विचार. असे काय देऊ शकता?4 / 11महिलांना आनंदी राहण्यासाठी कोणत्या आलिशान वस्तूंची गरज नसते. तर साध्या काही किरकोळ वाटणाऱ्या गोष्टींची गरज असते. त्या तुम्हाला पुरवण्यात जर समाज कमी पडतो आहे, तर त्या तुम्हीच स्वत:ला द्या.5 / 11जसं की 'झोप'. महिलांचा दिवस कधी सुरू होतो, कधी संपतो त्यांचं त्यांनाच कळतच नाही. स्वत:च्या मानसिक शांततेसाठी स्वत:ला काही आरामाचे क्षण भेट म्हणून द्या. जरा झोपेकडे लक्ष द्या.6 / 11 महिलांनी स्वत:मध्ये बिंबवली पाहिजे अशी गोष्ट म्हणजे 'आत्मसन्मान'. महिला कायम स्वत:च्या स्वाभिमानाला तडा जाऊ देतात. तसे न करता, स्वत:ची बाजू मांडायला शिका.7 / 11स्वत:ला जरा 'वेळ' गिफ्ट करा. तुमचा छंद शेवटचा कधी जोपासला होतात आठवत नाही आहे ना कारण तो तुम्ही मागे सोडून आलात. तो छंद जोपासण्यासाठी वेळ काढा. वेळ काढला की नक्कीच मिळतो.8 / 11महिलांसाठी गरजेचे आहे ते म्हणजे 'आर्थिक स्वातंत्र्य'. एखादा लहान का होईना व्यवसाय करावा. स्वत:चे चार पैसे प्रत्येक महिलेने कमवलेच पाहिजेत. 9 / 11या महिला दिनाला स्वत:ला एखादं 'यंत्र' गिफ्ट करा. जे तुमचे काम सोपे करेल. घरच्यांना पाट्यावरची चटणी आवडते म्हणून मिक्सर वापरत नाही. अशा अनेक महिला आहेत. स्वत:चे काम सोपे कसे होईल याची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे.10 / 11जर टॉक्सिक वातावरणात राहत आहात. तर स्वत:ला त्या वातावरणापासून 'स्वातंत्र्य' गिफ्ट करा. मन मारून कुडत जगू नका. जग बदलले आहे.आता विचार बदलले पाहिजेत. 11 / 11विकतच्या भेटवस्तू आपल्याला इतरही लोक देतात. पण या काही गोष्टी आहेत ज्या फक्त तुम्हीच स्वत:ला देऊ शकता. नक्कीच विचार करा.