पंखा खूपच स्लो चालतोय? ४ ट्रिक्स, वेगाने चालेल पंखा-इलेक्ट्रिशनयनला बोलावण्यापूर्वी ‘हे’ तपासा
Updated:August 12, 2024 12:55 IST2024-08-08T23:36:24+5:302024-08-12T12:55:04+5:30
Tips And Tricks Fan Speed Slowed Down : पंख्याची हवा व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही याचा कंडेन्सर चेक करून घ्या.

पावसाळा असो किंवा ऊन्हाळा प्रत्येक ऋतूत पंख्याची गरज भासते. पंख्याची हवा येतच नाही. पंखा वेळीच साफ केला नाही तर त्याचा वेग कमी होतो. नेहमी नेहमी इलेक्ट्रेटिशनयला बोलावून पैसे खर्च करण्यात काही अर्थ नसतो. हे काम खूपच सोपं आहे. या उपायाने पंख्याचा वेग १० पटीने जास्त वाढवता येतो. पंख्याचा वेग वाढवण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया.
पंख्याचा वेग कमी करण्यासाठी तुम्ही पंखा सावधगिरीने आधी खाली उतरवून घ्या. त्यानंतर बेअरिंगमध्ये थोडं मशिन ऑईल घाला. हे बेअरींग पंख्यामध्ये ल्युब्रिकेशन ठेवेल ज्यामुळे पंखा वेगाने फिरू लागेल.
पंख्यावर जमा झालेली धूळ, घाण स्वच्छ करण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. यामुळे पंख्याचा वेग वाढतो. तुम्ही पिलो कव्हरच्या मदतीाने पंख्याचे ब्लेड्स स्वच्छ करू शकता. ज्यामुळे चांगली हवा येईल.
पंख्याचा ब्लेड संतुलित नसेल किंवा वाकडा झाला असेल तर त्याची हवा व्यवस्थित येणार नाही. पंख्याची हवा आणि दिशेवर याचा परिणाम होऊ शकतो. ब्लेड्सचं संतुलन सरळ राहण्यास मदत होते.
पंख्याची हवा व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही याचा कंडेन्सर चेक करून घ्या.पंखा खराब होत असेल तर कंडेन्सर बदलून घ्या. जेणेकरून पंख्याचा वेग वाढेल
पंख्याचे कपॅसिटर बदलून पाहा. तुम्ही टेक्निशियनला बोलावून नवीन कपॅसिटर लावू शकता किंवा स्वत:बदलू शकता.
त्यासाठी कपॅसिटर काढताना त्याची योग्य जागा पाहून घ्या. ज्यापद्धतीने तुम्ही जुना कपॅसिटर काढाल तसाच दुसरा लावा.
दुसरीकडे जर पंखा स्लो चालत असेल तर यामागचं कारण दुसरं असू शकतं. पंख्यावर जर घाण लागली असेल तर ती आधी स्वच्छ करा.
स्टूलवर चढून किंवा पंखा साफ करण्याच्या मोठ्या ब्रशने पंखा स्वच्छ करून घ्या. आधी ओल्या कापडाने त्यानंतर सुक्या कापडाने पंखा स्वच्छ करा.