Join us   

मुंजीसाठी महागडं रुखवत विकत आणण्यापेक्षा या बघा ७ टिप्स, घरीच तयार होईल स्वस्तात मस्त रुखवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2022 4:59 PM

1 / 8
१. लग्नसराई सुरू झाली की त्यापाठोपाठ मुंजीचेही मुहूर्त असतातच. आजकाल मुंजदेखील लग्नाप्रमाणेच अत्यंत थाटामाटात आणि हौशेने केली जाते. लग्नात जसे रुखवत असते, तसेच मुंजीतही असते. खरं पाहिलं तर रुखवत तयार करणं हे थोड्याशा आयडिया वापरून आणि वेळ काढून करायचं काम. पण नेमकं रुखवत कसं करावं, हेच सूचत नसल्याने अनेक जण मग भरपूर पैसे देऊन मुंजीचं रुखवत विकत आणतात.
2 / 8
२. म्हणूनच या बघा काही मस्त आयडिया. या टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही घरच्याघरी अगदी कमी वेळात आणि स्वस्तात मस्त रुखवत तयार करू शकता. त्यापैकी ही पहिली आयडिया. अशा पद्धतीचे बिस्किट आणि चॉकलेट्सचे हार बटूसाठी तयार करणं काहीच अवघड नाही. बिस्किटांचा किंवा चॉकलेटचा नंतर खाण्यासाठी उपयोग व्हावा, असं वाटत असेल तर त्याचे कागद न काढता तसेच हार बनवू शकता.
3 / 8
३. बिस्किटचा सोफा सेट बनविण्याची ही एक सगळ्यात सोपी आयडिया. अगदी १० ते १५ मिनिटांत हा सेट तयार होतो. बिस्किटे, गोळ्या, खालचा बेस आणि डिंक एवढ्याच साहित्यात हा सेट तयार.
4 / 8
४. सोफासेट प्रमाणेच बिस्किटांची रेल्वेही अनेक ठिकाणी दिसून येते. थोडंसं बारकाईने निरिक्षण केलं तर अशी रेल्वे घरी बनवणं मुळीच अवघड नाही.
5 / 8
५. चॉकलेट्स, बिस्किटे यांचं लहान मुलांना सगळ्यात जास्त आकर्षण असतं. त्यामुळे अशा पद्धतीचा चॉकलेट- बिस्किटांचा बंगला हमखास मुंजीच्या रुखवतात दिसून येतो. जास्त वेळ नसेल तर यातला एखादा सोपा प्रकारही तुम्ही करू शकता.
6 / 8
६. पुर्वीच्या काळी उपनयन संस्कार म्हणजेच मुंज झाल्यानंतर बटू गुरूंच्या घरी शिक्षणासाठी जायचा. त्यामुळे त्याचं प्रतिक म्हणून अशा पद्धतीचं गुरूकुल अनेक मुजींच्या रुखवतावर दिसून येतं. गुरूकुल तयार करण्याची ही बघा एक सोपी पद्धत.
7 / 8
७. ज्याची मुंज आहे, त्याच्या आवडीनिवडी किंवा छंद लक्षात घेऊन अशा पद्धतीची एखादी चॉकलेटची वस्तूही बनवता येईल.
8 / 8
८. लग्नात विहिणीची पंगत जशी महत्त्वाची असते तशीच मुंजीमध्ये मातृभोजन महत्त्वाचे असते. सुपारी आणि काजू वापरून अशी छान पंगत तयार करता येते.
टॅग्स : सोशल व्हायरललग्न