१० लेटेस्ट टॉप फॅशनचे ड्रेस, तुम्हाला स्टायलिश दिसायचं तर हे स्मार्ट ड्रेस घाला
Updated:February 11, 2025 19:38 IST2025-02-11T19:26:43+5:302025-02-11T19:38:29+5:30
Trending Clothing In India, New Fashion Tips : बघा सध्या बाजारात कोणत्या कपड्यांना मागणी आहे.

सध्या कोणत्या ड्रेसिंग स्टाईल जास्त चालत आहेत ते जाणून घ्या. त्यामधील तुम्हाला जी आवडेल ती स्टाईल नक्की करून बघा.
१.सध्या डेलीवेअरसाठी कोऑर्ड सेट्स फार चालत आहेत. दिसायला सुंदर आणि कम्फर्टेबल असल्याने महिलांच्या पसंतीस पडले आहे.
२.आजकाल कोरियन पॅन्ट जवळपास सगळ्याच तरूण मुली वापरताना दिसतात. फॅन्सी येट सिंपल लुकसाठी तुम्हीही नक्की वापरून बघा.
३.सध्या कुर्ता सेट सर्वच वयोगटातील महिला वापरत आहेत. कुर्ताच्या खाली साधी किंवा प्लाझो पॅन्ट असते. सुटसुटीत पॅन्ट असल्याने महिला ऑफिसलाही असे सेट्स वापरत आहे.
४.सध्या जमसुट्स फार क्लासिलुक्स देणारे ठरत आहेत. डेट नाईट किंवा फिरायला जाताना घालण्यासाठी फारच मस्त प्रकार आहे.
५.सोबर लुकसाठी कॉटन शर्ट-पॅन्ट सेट ट्रेन्टींग आहेत. पॅन्टचा प्रकार सिगरेट पॅन्ट किंवा मिनी प्लाझो टाईप आहे. तसेच शर्ट हलके असल्याने मुलींना आवडतात.
६.आजकाल शॉर्ट कुर्ती खुप चालतात. मुलींना ट्रेडिशनल येट मॉडर्न असा लूक या कुर्तीमधून मिळतो. तो लुक त्यांना फारच आवडला आहे.
७.टाईट फिटींगसाठी सिगारेट पॅन्ट - कुर्ती सेट ट्रेंडींग आहे. अँकल लेन्थ पॅन्ट आणि गुडघ्या पर्यंत कुर्ता असा हा पेहराव आहे.
८.नीलेग्थ वनपीस ड्रेस सध्या फार फेमस आहेत. लॉंग हॅण्ड तसेच कॉटनचे ड्रेस सध्या सुपर हिट आहेत.
९. कफ्तान हा प्रकार तरूण वर्गात फेमस आहे. रोजच्या कपड्यांपेक्षा काही वेगळं घालायचं असल्यास हा पॅटर्न मस्त आहे.
१०.महाविद्यालयीन मुली सध्या क्रॉपटॉप मध्ये दिसतात. हा सध्या सगळ्यात जास्त चालणारा पॅटर्न आहे.