Truth About 4 Masturbation Myths : हस्तमैथुनामुळे हेअर फॉलो होतो? उत्तम लैंगिक आरोग्यासाठी तज्ज्ञांनी दूर केले गैरसमज Published:November 18, 2022 03:28 PM 2022-11-18T15:28:10+5:30 2022-11-18T15:40:58+5:30
Truth About 4 Masturbation Myths : हस्तमैथुनामुळे स्टॅमिना कमी होण्याची समस्या सहसा येत नाही. जेव्हा तुम्हाला लैंगिक उत्तेजना वाटेल तेव्हा तुम्ही हस्तमैथुन करू शकता. हस्तमैथुन (Masturbation) करावे की करु नये, ते केल्याने आरोग्यावर काही परिणाम होतात का या विषयावर सामान्यांमध्ये बरेच प्रश्न असतात. मात्र वेगवेगळ्या टप्प्यावर शारीरिक सुखासाठी पुरूष हस्तमैथुन करतात. यामुळे आनंद मिळतो आणि लैंगिक समाधान मिळते असे पुरुषांचे म्हणणे असते. मात्र तरी त्याबद्दल काही ना काही गैरसमज मनात असतात. हे समज वेळीच दूर केल्यास आपल्या शंकांची उत्तरे मिळण्यास मदत होते. डॉ. क्यूटर्स या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याचविषयी काही माहिती देण्यात आली आहे.
डॉ. तनाया नरेंद्र या स्त्रीरोगतज्ज्ञ याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे सांगतात. तुम्ही हस्तमैथुन करू इच्छित नसाल तर ठिक आहे पण तुम्हाला ते करण्याची इच्छा असेल तर त्यात फार काही गैर नाही. अनेकदा हस्तमैथुन केल्यानं पुरूषांना चांगली झोप येते, एकाग्रता होण्यास मदत होते आणि मनाला शांत वाटते. त्यामुळे हस्तमैथुन करणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते असे सरसकट म्हणणे योग्य नाही असेही त्या सांगतात.
1) हस्तमैथुनानं केस गळतात?
तज्ज्ञांच्यमते हस्तमैथुनामुळे केस गळण्याची समस्या उद्भवते यात फारसं तथ्य नाही. तुमचे केस खूप गळत असतील तर त्याला इतर गोष्टीही कारणीभूत असू शकतात. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार घेतल्यास ही समस्या दूर होऊ शकते.
2) स्टमिना कमी होतो?
हस्तमैथुनामुळे स्टॅमिना कमी होण्याची समस्या सहसा येत नाही. जेव्हा तुम्हाला लैंगिक उत्तेजना वाटेल तेव्हा तुम्ही हस्तमैथुन करू शकता. तुम्ही किती वेळा हस्तमैथुन करत आहात ते तुमच्या शारीरिक क्षमतेवर अवलंबून आहे. पण अतिप्रमाणात केल्यास थकवा जाणवू शकतो.
3) शरीरात प्रोटिन्सची कमतरता भासते
हस्तमैथुनाने लैंगिक भूक शांत होऊ शकते, असे डॉ.तनया सांगतात. पण काही लोकांना असं वाटतं ते केल्याने शरीरात प्रोटीनची कमतरता होते आणि त्यामुळे वाढीवरही परिणाम होतो. ज्यात काहीही तथ्य नाही.
4) हस्तमैथुनामुळे स्पर्म काऊंट कमी होतो
हस्तमैथुन करताना शरीरातून बाहेर पडणारे शुक्राणू तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत करत नाहीत किंवा शुक्राणूंच्या संख्येवर परिणाम करत नाहीत. उलट वस्तुस्थिती अशी आहे की हा शारीरिक आणि मानसिक आनंद देणारा व्यायाम आहे. शुक्राणू ही एक अशी वस्तू आहे जी पुरुषांच्या शरीरात रात्रंदिवस तयार होते. आहार व्यवस्थित नसेल, व्यायामाचा अभाव बैठी जीवनशैली यामुळे स्पर्म काऊंटवर परिणाम होतो.