लसूण सोलून सालं फेकून देता? लसणाच्या सालांचे ७ भन्नाट उपयोग, झुरळंही पळतील घरातून
Updated:October 20, 2023 16:41 IST2023-10-20T16:29:23+5:302023-10-20T16:41:22+5:30
Uses of garlic peel : लसणाच्या साली तुम्ही घरात ज्या ठिकाणी झुरळ येतात त्या ठिकाणी ठेवू शकता. जेणेकरून या वासाच्या तीव्रतेने लसूण घरात येणार नाहीत.

लसणाशिवाय भारतीय स्वंयपाक अपूर्ण आहे. लसणामुळे जेवणाला वेगळी चव येते जी दुसऱ्या कशामुळेही येऊ शकत नाही. लसूण सोलल्यानंतर बरेचजण लसणाचे साल फेकून देतात. लसणाचे सालं वापरून तुम्ही घरातील अनेक कामं करू शकता. यामुळे जास्त मेहनत न करता घर स्वच्छ होण्यास मदत होईल. (Five Good Reasons To Use Garlic and Peels)
भांडी धुण्यासाठी
भांडी धुण्यासाठी तुम्ही लसणाचं साल वापरू शकता. यासाठी लसणाचे साल व्यवस्थति सुकवून भांड्यांवर स्क्रबप्रमाणे वापरा. यामुळे भांड्याचा काळेपणा दूर होण्यास मदत होईल.
कपड्यांचा दुर्गंध दूर होतो
लसणाचे सुकलेले साल एका सुती कापडात पिशवीत ठेवून तुम्ही कपाटात ठेवू शकता. या उपायाने कपड्यांना जर दुर्गंध येत असेल तर तो कमी होईल. कारण लसणाची सालं पूर्ण मॉईश्चर शोषून घेतील आणि फ्रेश सुगंध येईल
खतात मिसळू शकता
जर तुमच्याकडे वनस्पतींचे खत असेल तर तुम्ही यात लसणाचे साल मिसळू शकता. यातील पोषक तत्व खताची क्वालिटी सुधारण्यास फायदेशीर ठरतील.
चटणीत वापरू शकता.
लसणाच्या सालीने तुम्ही जेवणाला फोडणी घालू शकता यासाठी लसणाच्या सालीवर व्हिनेगर घालून याचा वापर करा. किंवा लसणाची, शेंगदाण्याची चटणी बनवताना तुम्ही यात लसणाचे सालं मीठासह घालू शकता. यामुळे लसणाला उत्तम चव येईल.
झुरळं लांब राहतील
लसणाच्या साली तुम्ही घरात ज्या ठिकाणी झुरळ येतात त्या ठिकाणी ठेवू शकता. जेणेकरून या वासाच्या तीव्रतेने लसूण घरात येणार नाहीत.
घरगुती हेअर डाय
जर तुम्ही घरगुती हेअर डाय बनवणार असाल तर त्यात कांदा आणि लसणाचे साल वापरू शकता. जेणेकरून केसांचा नैसर्गिक काळा रंग टिकून राहण्यास मदत होईल.