गौरी-गणपतीसाठी वस्त्रमाळा करायच्या? बघा नव्या प्रकारचे सुंदर डिझाईन्स, पारंपरिकतेला नाविन्याची झालर By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2024 12:18 PM 1 / 10गौरी गणपतीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे बाप्पाच्या तसेच महालक्ष्मीच्या पुजेची तयारी घरोघरी सुरू झाली आहे. पुजेच्या साहित्यामध्ये वस्त्रमाळांना अतिशय महत्त्व आहे. (vastra mala designs for Gauri Ganpati festival)2 / 10अगदी अलीकडच्या काळापर्यंत आपण अशा प्रकारच्या पारंपरिक वस्त्रमाळा देवाला अर्पण करायचो. पण आता मात्र त्यामध्ये अतिशय देखणे असे नवनविन प्रकार आलेले आहेत (cotton garland designs for god). यंदाच्या उत्सवात अशा प्रकारच्या वस्त्रमाळा गौरी- गणपती साठी तुम्ही तयार करू शकता. (how to make vastramala)3 / 10आपल्या पारंपरिक वस्त्रमाळांना हा दिलेला एक नवीन टच बघा. नेहमीसारख्याच वस्त्रमाळा करायच्या, फक्त त्या ५ किंवा ३ पदरी गुंफायच्या.4 / 10हा एक आणखी सुंदर प्रकार. यामध्ये नेहमीप्रमाणेच वस्त्रमाळ करून घ्या. फक्त वरच्या बाजूला दोन सुंदर वेगळी फुलं तयार करा. असंच एखादं ठसठशीत पेंडंट करून तुम्ही ते मध्यभागीही लावू शकता. त्यामुळे त्यांची शोभा आणखीन वाढेल. 5 / 10हा एक देखणा प्रकार. यामध्ये फुलवातीप्रमाणे आधी आकार देऊन घेतला आणि मग तो एकात एक गुंफला. एखाद्या कागदाच्या घडीवर कापूस चिटकवून तुम्ही ही वस्त्रमाळ करू शकता. 6 / 10कुंदन किंवा स्टोन लावून तुम्ही अशा पद्धतीने वस्त्रमाळा सजवू शकता. नेहमीपेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं दिसेल. 7 / 10अशी ठसठशीत वस्त्र माळ गणपतीला किंवा गौरीला घातली तर इतर कुठल्या दुसऱ्या दागिन्याची गरजही पडणार नाही. 8 / 10या पद्धतीनेही तुम्ही वस्त्रमाळ करू शकता. यामध्ये कापसाच्या माळीला दोरे बांधण्यात आलेले आहेत. त्यामुळे कापूस एखाद्या टपोऱ्या मोत्याप्रमाणे दिसतो आहे. 9 / 10वस्त्रमाळ करण्याचा हा आणखी एक सोपा प्रकार पाहा.10 / 10अशा पद्धतीची वस्त्रमाळही तुम्ही करू शकता. यासाठी आधी फुलवात केल्याप्रमाणे कापसाच्या वाती करून घ्या आणि नंतर त्या एकमेकांमध्ये गुंफत चला. त्याला वरतून आकर्षक फुलं लावली की असा सुंदर लूक येतो. आणखी वाचा Subscribe to Notifications