वसुबारस : दिवाळीचा पहिला दिवा उजळताना काढा स्पेशल वसूबारस सोपी रांगोळी; इतकी सुंदर की पाहात राहावे.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2024 4:41 PM 1 / 10दिवाळी म्हणजे फराळ (Faral), रोषणाई आणि बरंच काही (Diwali). मुख्य म्हणजे रांगोळीशिवाय हा सण अपूर्ण आहे. दिवाळीला हमखास दाराबाहेर रांगोळी काढली जाते. रांगोळीमुळे प्रसन्न वाटतं(Vasubaras Diwali : very easy and beautiful vasubaras rangoli).2 / 10आज वसुबारस. यंदा २८ तारखेला वसुबारस आली आहे. हिंदू धर्मात गोवत्स द्वादशीला विशेष महत्त्व असून गाईला पवित्र मानलं जातं. 3 / 10दिवाळी हा सण वसुबारस या सणाने सुरु होते. या सणानिमित्त आपण दाराबाहेर किंवा अंगणात रांगोळी काढतोच. 4 / 10वसुबारसनिमित्त आपणही दाराबाहेर सुंदर रांगोळी काढू शकता. ठिपक्यांची किंवा छापा काढण्यापेक्षा आपण याही पद्धतीने सुंदर रांगोळी काढू शकता. 5 / 10गायीचे चित्र काढून, आपण त्याभोवतीने रांगोळी भरू शकता. 6 / 10रांगोळीचे विविध रंग वापरून, आपण दार किंवा अंगणासमोर सुंदर अशी गाय वासराची रांगोळी काढू शकता. 7 / 10जर आपल्याला गायीची रांगोळी काढायला जमत नसेल तर, आपण फक्त वसुबारस लिहून रांगोळी काढू शकता. 8 / 10जर आपल्याला आकाराने मोठी रांगोळी काढायची असेल तर, गाय - वासरूची जोडी काढून, त्या भोवती फुलांची रांगोळी काढा. 9 / 10आपण छाप्याचा वापर करूनही डिझाईन काढू शकता, आणि रांगोळीच्या मधोमध वसुबारस लिहू शकता.10 / 10रांगोळीचा रंग आणि तुमचा उत्साह हा घरातील प्रत्येकाचा चेहऱ्यावर आनंद घेऊन येईल हे नक्की. वसुबारसचीही सुंदर रांगोळी काढून, दिवाळी सण साजरा करा. आणखी वाचा Subscribe to Notifications