1 / 10'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) म्हणत प्रेक्षकांशी नातं जोडणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सर्वांनाच ठाऊक आहे. तिने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. पहिले सुशांत सिंह राजपूत, नंतर विकी जैन आणि सध्या बिग बॉस सिझन १७च्या एका एपिसोडमुळे ती सोशल मीडियात प्रचंड चर्चेत आली आहे. पडद्यामागील सासू सुनेचा वाद आपण पाहिलंच असेल, पण पडद्यावर कधी रिअल लाईफ सासू सुनेचा वाद पाहिलं आहे का?(Vicky's mother reprimands Ankita for their fights on 'BB 17').2 / 10बिग बॉसमधील नुकताच व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये अंकिताच्या सासूने भर कार्यक्रमात सुनेला खडसावले. मात्र, रागवण्यामागचं कारण काय? तिने चारचौघात सुनेला का झापले? सासूला नेटकरी का ट्रोल करत आहेत? पाहूयात.3 / 10बिग बॉस १७ हा सिझन अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. यात अनेक कपल्सने भाग घेतला असून, ज्यात अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचाही सहभाग आहे. दोघेही सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असतात. दोघांचे रोमॅण्टिक फोटो, व्हिडिओ पाहून अनेकांना या कपल्सचं कौतुक वाटायचं. पण हे सोशल मिडियापुरतंच मर्यादित होतं का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. कारण बिग बॉसच्या घरात या दोघांचं वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. दोघांमध्ये होणारी सततची भांडणं, विकीकडून अंकिताचा होणारा अपमान, या सगळ्या गोष्टी पाहून चाहते संभ्रमात पडले आहे. 4 / 10नुकताच बिग बॉसचा नवीन प्रोमो सोशल मीडियात व्हायरल झाला. कारण या एपिसोडमध्ये दोघांच्या आईने बिग बॉसच्या शोमध्ये हजेरी लावली. प्रोमोच्या सुरुवातीला आपापल्या आईला पाहून अंकिता आणि विकी दोघेही खुश झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, नंतर विकीला रडू कोसळते. तर यावर त्याच्या आईने विकीला काही गोष्टी सांगून समजवण्याचा प्रयत्न केला. शिवाय अंकितालाही दोन शब्द बोलून खडसावले. 5 / 10विकीचं रडणं पाहून अंकिताची सासू म्हणते, 'विकी रडू नकोस, आम्ही तुला असं रडताना कधी पाहिलं नाही. संपूर्ण घराला तू सांभाळतोस बाळा. पण तुझं हे घर नाही, हे तुझे लोकं नाहीत. विविध लोकं या ठिकाणी गेम खेळायला आले आहेत, आणि तू ही इथे खेळ खेळायला आला आहेस. शांत डोक्याने विचार करून, व आपलं नातं टिकवून खेळ जिंक.' यावर अंकिता, 'मी आहे आई, मी विकीची काळजी घेईन.' 6 / 10त्यावर विकिची आई चिडून म्हणते, 'नाही तू माझ्या मुलाचा नीट सांभाळ करत नाहीयेस, बघ तो कसा रडत आहे. आपल्या घरात तुमचे कधीही खटके उडाले नाही. पण इथे तुम्ही किती भांडत आहात. तुझ्या बोलण्यावरून आम्ही विकीला तुझ्यासोबत या शो मध्ये धाडलं. पण या ठिकाणी काही भलत्याच गोष्टी घडताना दिसून येत आहे. कशी का असेना तुला विकीने सूट दिली आहे..' यावर सासूचं बोलणं मध्येच थांबवत अंकिता म्हणते, 'सूट दिली म्हणजे मम्मा'? त्यावर अंकिताची सासू, 'तुम्हाला हात जोडून विनंती करते, भांडू नका.' असे म्हणते.7 / 10नंतर अंकिताची आई प्रतिक्रिया देत म्हणाली की, 'तुमचं खूप चांगलं बॉण्ड आहे. भांडणं न करता खेळावर लक्ष द्या. नातं टिकवून असं गेम खेळा की बाहेर आल्यानंतर लोकांनी तुमचं कौतुक केलं पाहिजे.' हे ऐकून अंकिताच्याही डोळ्यात पाणी येतं. 8 / 10या प्रोमोमुळे विकी जैनची आई अर्थात अंकिताची सासू तिच्यावर नाराज असल्याचं पाहायला मिळालं. शिवाय तिने नॅशनल टीव्ही चॅनेलवर सुनेला सुनावलं. त्यामुळे नेटकऱ्यांनी विकीच्या आईवर नाराजी व्यक्त केलीय. 'अंकिता टीव्ही इंडस्ट्रीतलं मोठं नाव आहे. तिला असं नको बोलायला हवं होतं', असं तिच्या चाहत्यांनी म्हटलंय. शिवाय 'विकीच्या आईने सुनेची बाजू न समजताच, मुलाची बाजू घेत सुनेला खडसावने हे योग्य नाही', अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली. 9 / 10'शेवटी सासू ती सासुच असते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ही सासू तर रेड फ्लॅग आहे.' अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली असून, बिग बॉसचा हा प्रोमो चांगलाच व्हायरल होत आहे.10 / 10दरम्यान, काही दिवसांपूर्वी अंकिता बिग बॉसच्या घरात गरोदर असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अंकिताच्या या टेस्टचा रिपोर्ट समोर आला असून, रिपोर्टवरून अंकिता गरोदर नसल्याचे सिद्ध झालं आहे.