5 किलोचे गुटगुटीत बाळ, नॉर्मल प्रसूतीनंतर आईने सांगितले उत्तम तब्येतीचे सिक्रेट By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 4:48 PM 1 / 8जन्माच्यावेळी बाळाचे वजन साधारणपणे ७.५ पाऊंड म्हणजेच साडेतीन किलो असते. सोशल मीडीयावर एका वजनदार बाळाचा फोटो सध्या व्हायरल होतोय. एका महिलेनं कोणत्याही अडचणींना सामोरं न जाता ५ किलोच्या बाळाला जन्म दिला आहे. म्हणजेच जन्माच्यावेळी या बाळाचे वजन ११ पाऊंड होते. 2 / 8या बाळाच्या आईनं सांगितलं की, ''मी कोणत्याही एपिड्यूरल किंवा पेन किलर औषधांची मदत घेतली नाही. कोणत्याही मेडिसिन्सचा आधार न घेता मी जास्त वजनाच्या बाळाला जन्म दिला आहे.'' सहजा जास्त वजन असलेल्या बाळाच्या जन्मासाठी आईला ऑपरेशनचा आधार घ्यावा लागतो पण या महिलेच्या बाबतीत असं काहीही झालं नाही. 3 / 8टिकटॉकवर क्राफ्ट मॉम नावानं चर्चेत असलेल्या एका महिलेनं एका कॉल आऊट दरम्यान याचे उत्तर दिले. या कार्यक्रमात साधारण वजनापेक्षा जास्त वजन असलेल्यांची घोषणा करण्यात आली. 4 / 8महिलेनं सांगितले की, ''तुम्हाला एक मोठं, जास्त वाढ झालेलं मुल पाहायचं? इथं असंच एक बाळ आहे. पण त्याच्या जन्माच्यावेळी मी कोणत्याही एपिड्यूरल आणि पेनकिलर्सचा गोळ्या घेतलेल्या नाहीत.''5 / 8महिलेनं आपल्या लहान बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत सांगितले होते की मी या बाळाला ४१ आठवड्यात जन्म दिला आहे. 6 / 8बाळाच्या आईनं हे सगळं सांगितल्यानंतर सोशल मीडिया युजरनं पोस्ट लिहिली की, 'मी तुमचं दुख: समजू शकते. तुम्ही एक स्ट्राँग वूमन आहात.'7 / 8 जेव्हा महिलेच्या फॉलोअर्सपैकी एकजण म्हणाला की, ती जिंकली आहे. तेव्हा तिनं उत्तर दिलं की,'' माझे वडील जन्माच्यावेळी १४ पाऊंडचे होते. म्हणून माझं बाळही इतकं वजनदार आहे.''8 / 8 सोशल मीडिया युजर्स या महिलेवर कौतुकाचा वर्षाव करत असून अनेकांनी आपल्यात खूप हिम्मत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications