1 / 6सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे कोणत्याही शुभकार्यात आपण रांगोळी काढतोच तशी लग्नप्रसंगीही काढतोच (wedding special rangoli). पण इतरवेळी जशी रांगोळी काढतो तशीच रांगोळी लग्नसमारंभात काढली तर तिचं वेगळेपण काय..(easy rangoli designs for haldi program in wedding)2 / 6म्हणूनच हे काही रांगोळी डिझाईन्स पाहा आणि हळदीच्या कार्यक्रमात अशी एखादी वेगळी रांगोळी काढा..3 / 6रांगोळीचे रंग वापरण्याऐवजी तुम्ही अशी फुलांची रांगोळीही काढू शकता. झेंडूच्या फुलांचा रांगोळीतला वापर नेहमीच रांगोळीची प्रसन्नता आणखी वाढवतो.4 / 6ही आणखी एक हळद स्पेशल रांगोळी पाहा. दिसायला मोठी असली तरी खूप पटापट काढता येण्यासारखी आहे.5 / 6फुलांच्या पाकळ्या, आंब्याची पानं, विड्याची पानं वापरून तुम्ही ही रांगोळी काढू शकता. मधाेमध छान कलश ठेवा. रांगोळी खूप आकर्षक दिसेल आणि तुमच्या लग्नसराई थीमला शोभून दिसेल.6 / 6सनई आणि चौघडे हे तर लग्नाचे खास वैशिष्ट्य.. त्यांच्याशिवाय लग्नघर असूच शकत नाही. त्यामुळे तुमच्या रांगोळीतही ते तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकता.