Join us   

उन्हाळ्यात स्वयंपाक करताना चटका बसल्यावर खूपच आग होते? ३ टिप्स लक्षात ठेवा, आग होईल चटकन कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2024 9:11 AM

1 / 6
इतर कोणत्याही ऋतूमध्ये होत नाही एवढा त्रास उन्हाळ्यात स्वयंपाक करताना होतो. घामाच्या अक्षरश: धाराच लागतात.
2 / 6
अशावेळी जर हाताला किंवा शरीरावर इतर ठिकाणी काही पोळलं किंवा भाजलं तर मात्र खूपच भयानक त्रास होतो. हिवाळा, पावसाळ्या या थंड ऋतूंच्या तुलनेत उन्हाळ्यात होणारा त्रास खूपच तीव्र असतो.
3 / 6
म्हणूनच या वेदना कमी करण्यासाठी चटका बसल्या बसल्या लगेचच काय करायचं याचे हे काही सोपे उपाय पाहून घ्या. या उपायांमुळे होणारी आग- आग बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते.
4 / 6
सगळ्यात पहिलं म्हणजे टोमॅटो अर्धा चिरा आणि लगेचच तो चटका बसलेल्या ठिकाणी चोळा. टोमॅटोमध्ये असणारे काही घटक वेदनाशामक म्हणून काम करतात आणि शरीराला थंडावा देतात.
5 / 6
दुसरं म्हणजे ज्या भागावर चटका बसला आहे, तो भाग लगेचच पाण्याखाली धरा. जर अंगावर तेल सांडलं असेल तर मात्र चुकूनही त्या भागावर पाणी टाकू नका. पण भाजलं असेल तर हा उपाय करायला हरकत नाही.
6 / 6
तिसरा उपाय म्हणजे पोळलेल्या भागावर लगेचच कोरफडीचा ताजा गर आणून लावणे. यामुळेही थंडावा मिळतो आणि आग कमी होते.
टॅग्स : सोशल व्हायरलहोम रेमेडीत्वचेची काळजी