1 / 12किचनमधील नेहमीची काम पटापट उरकण्यासाठी आपण वेगवेगळ्या (When is the Right Time to Replace Your Cookware & Kitchen Tools) उपकरणांचा - साधनांचा वापर करतो. आपल्या किचनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची भांडी असतात. 2 / 12आपण याच भांड्यांचा वापर करुन वर्षानुवर्षे स्वयंपाक (How To Know When Your Cooking Tools Need Replacing ) करत असतो. गरजेनुसार आपण ही भांडी धुवून पुसून स्वच्छ ठेवतोच. परंतु किचनमधील या नेहमीच्या वापरातील काही वस्तू ठराविक एका काळानंतर बदलण्याची गरज असते. 3 / 12आपण या वस्तू वेळच्यावेळी स्वच्छ करत असलो तरीही त्या वस्तू सतत वापरून खराब होतात तसेच त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया वाढतात, जे अन्नावाटे आपल्या पोटात जाऊन आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. यासाठी किचनमधील नेहमीच्या वापरातील कोणत्या वस्तू नेमक्या किती काळाने बदलाव्यात ते पाहूयात.4 / 12नॉनस्टिक तवे - पॅन दर ३ ते ५ वर्षांनी बदलावेत. कारण त्यावरील कोटिंग सतत वापरुन खराब होते आणि ते निघू लागते. कोटिंग निघालेल्या पॅनमध्ये पदार्थ चिकटून राहतो तसेच अशा पॅनमध्ये पदार्थ करणे हानिकारक ठरु शकते. 5 / 12लाकडी चॉपिंग बोर्ड दर १ ते २वर्षांनी बदलावा. लाकडी चॉपिंग बोर्ड वातावरणातील मॉइश्चर शोषून घेते तसेच तो धुतल्याने त्यात ओलावा राहिला तर लगेच खराब होऊ शकतात. तसेच ओलाव्याने बॅक्टेरियांची वाढ होऊ शकते. 6 / 12भांडी घासण्याच्या स्पंज - स्क्रबरमध्ये ओलाव्यामुळे बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते तसेच यात अन्नकण राहिल्याने ते कुजून खराब होऊ शकतात. यासाठी भांडी घासण्याच्या स्पंज - स्क्रबर दर २ ते ४ आठवड्यांनी बदलावे. 7 / 12रोजच्या वापरातील सुऱ्या - चाकूंना दर ३ ते ६ महिन्यांनी चांगली धार काढावी. याचबरोबर, प्रत्येक ५ ते १० वर्षांनी किचनमधील चाकू - सुऱ्या बदलाव्यात. 8 / 12 किचनमधील प्लॅस्टिकचे डबे - कंटेनर्स दर ६ महिन्यांनी किंवा वर्षभरात बदलणे गरजचे असते. प्लॅस्टिकचे डबे - कंटेनर्स जर वर्षभरापेक्षा दीर्घकाळ वापरले तर या प्लॅस्टिक मधून काही विषारी घटक बाहेर पडतात जे आपल्या आरोग्यासाठी घातक असतात. 9 / 12मिक्सरच्या भांड्यात असणाऱ्या ब्लेड्स दर २ ते ३ वर्षांनी बदलाव्यात. कारण बोथट झालेल्या पातींमुळे पदार्थ मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घेता येत नाही. 10 / 12 गॅसचे बर्नर दर महिन्याला स्वच्छ करावेत आणि १० ते १५ वर्षांनी बदलावेत. बर्नर वेळच्यावेळी व्यवस्थित स्वच्छ केल्याने फ्लेम नीट पेटून स्वयंपाक करणे सोपे जाते. 11 / 12 तेल स्टोअर करून ठेव्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या दर १ ते २ वर्षांनी बदलाव्यात. कारण प्लॅस्टिकच्या बाटलीत तेल ठेवल्याने त्याची ऑक्सिडाइज होण्याची प्रक्रिया फार वेगाने होते, यामुळे तेल खराब होऊ शकते.12 / 12किचनमध्ये वेगवेगळ्या कामांसाठी आपण छोटे छोटे नॅपकिन्स, रुमाल वापरतो ते दर ६ महिन्यांनी किंवा वर्षाने बदलावेत. कारण सतत वापरून मळलेल्या, तेलकट - चिकट झालेल्या या टॉवेल्सवर बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते.