Join us   

कुठं जाणार पिकनिकला? रेल्वे स्थानकांची नावं पाहून करणार का डेअरिंग? पाहा व्हायरल झूकझूक गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2023 5:04 PM

1 / 10
आपण फिरायला किंवा गावी जात असताना अनेक वाहनांचा उपयोग करून जातो. कोणी ट्रेनमधून जातं, तर कोणी बस अथवा चारचाकी. जेव्हा पण आपला ट्रेनद्वारे प्रवास होतो, तेव्हा आपल्याला अनेक नवनवीन रेल्वे स्थानकांची नावं दिसतात. त्यातील काही नावं विचित्र असतात तर काही कॉमेडी असतात. सध्या असेच काहीसे विचित्र आणि कॉमेडी रेल्वे स्थानकांची नावे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2 / 10
राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील एका रेल्वे स्थानकाला 'बाप' असे नाव देण्यात आले आहे. आता 'बाप' म्हटलं की आपल्याला वडील आठवणार. मात्र, या रेल्वे स्थानकाला बाप असे का नाव देण्यात आले हे अद्याप कोणाला माहिती नाही.
3 / 10
दक्षिण-मध्य रेल्वे अंतर्गत विजयवाडा विभागात 'बीबीनगर' नावाचे रेल्वे स्थानक आहे. हे रेल्वे स्टेशन तेलंगणातील भुवानीनगर जिल्ह्यात आहे. मात्र, या रेल्वे स्थानकाच्या नावाचा कोणत्याही व्यक्तीच्या पत्नीशी म्हणजेच 'बीबी' सोबत संबंध जोडला गेला नाही.
4 / 10
राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील दुडू नावाच्या ठिकाणी 'साली' नावाचे रेल्वे स्थानक आहे. आता साली म्हटलं की 'साली होती हैं आधी घरवाली' हा डायलॉग आठवणार. मात्र, या डायलॉगचा आणि या रेल्वे स्थानकाचा काहीही संबंध नाही.
5 / 10
राजस्थानमधील सिरोही पिंडवाडा नावाच्या ठिकाणी 'नाना' नावाचे रेल्वे स्टेशन आहे. एका रेल्वे स्थानकाला 'बाप' नाव देण्यात आले आहे, त्यामुळे 'नाना' म्हणजेच आजोबांचं नाव देखील द्यायलाच हवे, नाही का ? मात्र, या रेल्वे स्थानकाला नाना का नाव देण्यात आले हे अद्याप कोणाला माहिती नाही.
6 / 10
सुअर नावाचं रेल्वे स्टेशन असेल असं क्वचितच कुणाला वाटलं असेल. कारण आपण अनेक चित्रपटात 'सुअर की औलाद' हा डायलॉग चित्रपटात ऐकलंच असेल. हे रेल्वे स्थानक उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात येते. मुरादाबाद, अमरोहा आणि रामपूर ही या स्थानकाजवळील प्रमुख स्थानकांची नावे आहेत.
7 / 10
कर्नाटकातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक असलेल्या कुर्गमधील, या छोट्या रेल्वे स्थानकाला 'कुत्ता' रेल्वे स्टेशन असे नाव देण्यात आले आहे. या रेल्वे स्थानकाला 'कुत्ता' हे नाव का देण्यात आले असेल याचा शोध घेणं कठीण आहे.
8 / 10
'बिल्ली' नावाचं रेल्वे स्थानक कधी तुम्ही ऐकलंय का? हे रेल्वे स्टेशन उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर मांजरी आढळत असतील असा अंदाज लावायला काही गैर नाही.
9 / 10
भैंसा ट्रेन आपण ऐकलीच असेल, पण भैंसा रेल्वे स्टेशन असे स्थानकाचे नाव कधी ऐकले आहे का? तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील या स्टेशनला भैंसा स्टेशन का नाव पडले हे कोणालाच माहीत नाही.
10 / 10
पंजाबच्या जालंधरमधील एका गावाच्या अंतर्गत 'काला बकरा' नाही सापडला तरी, रेल्वे स्थानक नक्की सापडेल. पंजाबमध्ये एका रेल्वे स्थानकाचे नाव 'काला बकरा' असे आहे. या रेल्वे स्थानकाच्या नावाची सोशल मीडियावर खूप चर्चा होते.
टॅग्स : सोशल व्हायरलसोशल मीडिया