Join us   

गौरी खानची अतीश्रीमंत मैत्रीण असलेली शालिनी पासी नक्की कोण? सोशल मीडियात ‘तिच्या’च लाइफस्टाइलची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2024 4:03 PM

1 / 11
शालिनी पासी. हे नाव सध्या 'फॅब्युलस लाइव्ह्स व्हर्सेस बॉलीवूड वाइव्हज' या रिॲलिटी टीव्ही शोमुळे चर्चेत आहे (Fabulous Lives vs. Bollywood Wives). शिवाय 'द कपिल शर्मा शोमध्ये केलेलं वक्तव्यामुळेही प्रकाशझोतात आली आहे (Shalini Passi). दरम्यान, सौंदर्यवती तशीच जिम्नॅस्ट शालिनी पासी नक्की कोण?(Who Is Shalini Passi? All You Need To Know About The New Star of ‘Fabulous Lives vs. Bollywood Wives’ Season 3).
2 / 11
'फॅब्युलस लाइव्ह्स व्हर्सेस बॉलीवूड वाइव्हज' ही एक रिॲलिटी टीव्ही शो आहे. ज्यामध्ये अनेक ग्लॅमरस अभिनेत्री आहेत. या शोच्या तिसऱ्या सिझनमध्ये रिद्धिमा कपूर साहनी, शालिनी पासी आणि कल्याणी साहा यांनी पदार्पण केलं. यापैकी शालिनी पासी चांगलीच चर्चेत आली. कारण तिचं फॅशन सेन्स आणि अलिशान लाईफस्टाईल हे डोळे दिपवणारे आहे.
3 / 11
नुकतंच तिने 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली होती. ज्यात तिने कपिल शर्मा शो कृषीदर्शन शो प्रमाणे वाटत असल्यासारखं सांगितलं.
4 / 11
ती म्हणाली, 'जेव्हा मी तुझा शो पहिल्यांदा पाहिला तेव्हा मला माझ्या आजोबांची आठवण आली. कारण मी त्यांच्यासोबत कृषीदर्शन पाहायचे. या शोमध्येही तशीच भाषा वापरण्यात येते.' तेव्हा कपिल 'तुम्हाला आमचा शो त्या शोसारखा वाटतो का?' असा प्रश्न विचारला, त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
5 / 11
शालिनीचा जन्म ८ ऑगस्ट १९७६ रोजी दिल्लीत झाला. तिथेच ती लहानाची मोठी झाली. नवी दिल्लीतील मॉर्डन शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. शालेय शिक्षणात ती खूप हुशार होती. तिने कला क्षेत्रात पुढील शिक्षण पूर्ण केलं.
6 / 11
शालिनी राज्यस्तरीयवर जिम्नॅस्ट आहे. 'माय आर्ट शालिनी' आणि 'शालिनी आर्ट फाउंडेशन'ची मालकीण आहे. या दोन प्रोजेक्ट्समुळे रायझिंग स्टार्सना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते.
7 / 11
शालिनी अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खानची खास मैत्रीण आहे. भरपूर पार्ट्यांमध्ये ते एकत्र दिसतात.
8 / 11
शालिनीला फक्त बिझनेसमध्ये नाही तर, गायन, संगीत, स्कुबा डायव्हिंग आणि डान्सिंगमध्ये खूप रस आहे.
9 / 11
आर्किटेक्चरल डायजेस्टनुसार, शालिनीचे दिल्लीतील घर २०,००० स्क्वेअर फूटमध्ये बनले आहे. तिच्या घरात ४ खोल्या आहेत. तिचे घर अतिशय भव्य आहे, जे तिने तिच्या आर्ट कलेक्शनने सजवले आहे.
10 / 11
मल्टीटॅलेण्टेड असण्यासोबत शालिनी सुपर स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. शालिनी सोशल मीडियावरही खूप सक्रीय असते. तिचे १ मिलियन फॉलोअर्स आहेत.
11 / 11
शालिनीचे पती संजय पासी हे मोठे उद्योगपती आहेत. तिचे पती पास्को ग्रुपचे चेअरमॅन आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांची गणना केली जाते.
टॅग्स : नेटफ्लिक्सकपिल शर्मा सोशल व्हायरलसोशल मीडिया