ऑस्ट्रेलियाने जिंकला वर्ल्ड कप आणि चर्चा एका भारतीय तरुणीची! कोण ती, मिचेलबरोबरचे फोटो व्हायरल Published:November 23, 2023 05:54 PM 2023-11-23T17:54:23+5:30 2023-11-24T11:55:59+5:30
Who is Urmila Rosario, manager of the 2023 World Cup champions Australia : ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक यशामागे कर्नाटकची महिला, क्रिकेट खेळाबद्दल नव्हते एवढे ज्ञान, तरीही आज... मागच्या आठवड्यातील धुवादार खेळीनंतर ऑस्ट्रेलियन संघाने (Team Australia) आपल्या मायदेशी वर्ल्ड कप वाजत गाजत नेला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना चुरशीचा ठरला. शेवटपर्यंत टीव्हीवर अनेकांच्या नजरा खिळून राहिल्या. मात्र, शेवटी १४० कोटी भारतीयांचे स्वप्न भंगले. ऑस्ट्रेलियन संघाने सहा विकेट्स राखून विजय मिळवला तर खरा, पण या यशामागे कर्नाटकच्या एका महिलेचाही हात असल्याचं बोललं जातंय(Who is Urmila Rosario, manager of the 2023 World Cup champions Australia?).
उर्मिला रोसारिया असे त्या महिलेचं नाव असून, त्या महिलेचं ऑस्ट्रेलिया संघासोबत कनेक्शन काय? तिला या यशामागे भागीदार का ठरवलं जातंय? ती महिला नक्की आहे तरी कोण? पाहूयात.
ऑस्ट्रलियन संघाची मॅनेजर उर्मिला रोसारिया ही भारतीय असून, तिचा सध्या एक फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिच्या हातात २०२३ चा विश्वचषक असून, तिच्या शेजारी ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क उभा आहे. मात्र, नेटकरी तिचा आणि ऑस्ट्रेलियन संघाच्या विजयामागे संबंध काय? असा प्रश्न उपस्थित करत आहेत.
उर्मिला रोझारियो ही ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची मॅनेजर आहे. तिचे आईवडील, आयव्ही आणि व्हॅलेंटाईन रोझारियो, कर्नाटकातील मंगळूरुजवळील किन्निगोली येथील रहिवासी आहेत. उर्मिलाचा जन्म कतार येथे झाला, तेव्हा आयव्ही आणि व्हॅलेंटाईन कामानिमित्त कतारमध्ये शिफ्ट झाले होते. उर्मिलाचा जन्म झाल्यानंतर हे जोडपं पुन्हा आपल्या मायदेशी परतले. त्यानंतर त्यांनी कॉफी इस्टेट विकत घेतली, व कर्नाटकातील सकलेशपूर येथे स्थायिक झाले.
उर्मिलाने कार्नेगी मेलॉन विद्यापीठातून बीबीए ही पदवी प्राप्त केली. उर्मिलाला लहानपणापासून विविध खेळांची आवड होती. आपल्या ४ भावडांपैकी तिला एकटीलाच स्पोर्ट्समध्ये आवड आहे. शाळेच्या दिवसात तिला क्रिकेटपेक्षा बास्केटबॉल आणि टेनिस या खेळामध्ये रुची होती. ती प्रोफेशन म्हणून टेनिस या खेळात नशीब आजमावणार होती. मात्र, काही अपघातांमुळे तिला टेनिसमध्ये करिअर घडवता आले नाही.
वैयक्तिक जीवनातील अपघातानंतर तिने स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये करिअर घडवण्याचा निर्णय घेतला. उर्मिलाने सुरुवातीचे तीन वर्ष कतार टेनिस फेडरेशनसाठी काम केले. नंतर तिने जवळपास तीन वर्ष ऑस्ट्रेलियातील एडिलेट क्रिकेट टीमचा कार्यभार सांभाळला. क्रिकेटमधून ब्रेक घेत, ती गेल्या वर्षीच्या फिफा विश्वचषकाच्या फुटबॉल स्टेडियमचे व्यवस्थापन सांभाळण्यासाठी सज्ज झाली. कतारमधून नंतर ती ऑस्ट्रेलियात परतली.
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघातील व्यवस्थापक म्हणून असेलेली उर्मिलाची कामगिरी पाहून, नंतर तिची निवड ऑस्ट्रेलियन पुरुष संघासाठी मॅनेजर म्हणून निवड करण्यात आली. संघ व्यवस्थापक म्हणून एका भारतीय व्यक्तीची निवड झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
ऑस्ट्रेलियन संघाची व्यवस्थापक म्हणून निवड झाल्यानंतर, तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'एकेकाळी मला क्रिकेट हा खेळ फारसा आवडत नव्हता. मला क्रिकेट या खेळाबद्दल एवढे ज्ञान नव्हते. मात्र, हळूहळू माझे क्रिकेटसोबत असलेले नाते उत्तमरित्या जुळत गेले.'