कांदा खाल्ला की तोंडाला वास येतो? ४ उपाय, कांदा खाल्ल्याने येणारा वास झटपट टाळा

Published:August 29, 2023 09:14 AM2023-08-29T09:14:00+5:302023-08-29T13:57:15+5:30

Why Eating raw onions gives bad smell : कच्चा कांदा खाल्ल्यानंतर तुम्ही बडीशेप खाल्ली तर तोंडाला कांद्याचा वास येणार नाही.

कांदा खाल्ला की तोंडाला वास येतो? ४ उपाय, कांदा खाल्ल्याने येणारा वास झटपट टाळा

कांदा तब्येतीसाठी पोषक मानला जातो. कांद्यात अनेक गुणकारी पोषक तत्व असता. यात सल्फर, पोटॅशियम, जिंक असते. (Three Tips to Get Rid of Onion Breath) कांद्याच्या सेवनानं अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव होतो. कांदा आपण स्वयंपाकात वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो.

कांदा खाल्ला की तोंडाला वास येतो? ४ उपाय, कांदा खाल्ल्याने येणारा वास झटपट टाळा

कधी मसाल्यांमध्ये वाटून तर कधी अख्खा कांदा स्वंयपाकात वापरला जातो. भेळ, शेवपूरी, पाणी पूरी खाताना बऱ्याचदा कच्चा कांदा खाण्यात येतो. (Three Tips to Get Rid of Onion Breath)

कांदा खाल्ला की तोंडाला वास येतो? ४ उपाय, कांदा खाल्ल्याने येणारा वास झटपट टाळा

कांदा खाणं कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसात गरमीपासून बचावसाठी कांदा फायदेशीर ठरतो. यामुळे इम्यूनिटी चांगली राहते आणि आदारांपासूनही बचाव होतो. पण कच्चा कांदा खाल्ल्याने तोंडाला वास येतो. तोंडाला वास आला की लोक आपल्या आसपासही बसत नाही. म्हणून अनेकजण कांदा खाणं टाळतात.

कांदा खाल्ला की तोंडाला वास येतो? ४ उपाय, कांदा खाल्ल्याने येणारा वास झटपट टाळा

जेवताना जर तुम्ही सॅलेडमध्ये कच्च्या कांद्याचे सेवन करत असाल तर आधी कांदा लिंबू किंवा व्हिनेगरमध्ये बुडवून ठेवा. त्यानंतर खा. या पद्धतीनं कांदा खाल्ल्याने वास कमी होईल. यामुळे तोंडाचा दुर्गंध कमी होतो.

कांदा खाल्ला की तोंडाला वास येतो? ४ उपाय, कांदा खाल्ल्याने येणारा वास झटपट टाळा

कच्चा कांदा खाल्ल्यानंतर तुम्ही बडीशेप खाल्ली तर तोंडाला कांद्याचा वास येणार नाही. बडीशेपमध्ये एरोमेटीक गुण असतात जे माऊथ फ्रेशनरच्या स्वरूपात वापरले जातात. बडीशेप चावल्यानं तोंडातून दूर्गंध येण्याचा त्रास कमी होतो.

कांदा खाल्ला की तोंडाला वास येतो? ४ उपाय, कांदा खाल्ल्याने येणारा वास झटपट टाळा

वेलचीसुद्धा माऊथ फ्रेशरनरच्या स्वरूपात काम करते. वेलची तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. वेलचीच्या सुगंधाने तोंडात कच्च्या कांद्याचा वास येत नाही. याशिवाय पचन क्रियाही चांगली राहते.

कांदा खाल्ला की तोंडाला वास येतो? ४ उपाय, कांदा खाल्ल्याने येणारा वास झटपट टाळा

कांदा खाल्ल्यानंतर लगेच चूळ भरा किंवा वेळ असेल तर व्यवस्थित ब्रश करा जेणेकरून तोंडाचा दुर्गंध येणार नाही.