जुन्या फाटक्या जीन्स फेकून देता? बनवा जुन्या जीन्सच्या ८ भन्नाट वस्तू, इतक्या सुंदर की दिल खुश By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2022 6:51 PM 1 / 9सध्या स्टायलिश पॅन्टच्या विविध पॅटर्न बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, जीन्सला अद्यापही तितकीच डिमांड पाहायला मिळते. पुरुष असो या स्त्री प्रत्येकाला जीन्स प्रचंड आवडते. जीन्समध्ये प्रत्येकाला आरामदायक वाटते. कितीही धुमसून वापरलं तरी या जीन्स फाटत नाहीत. अनेक वेळा जुनी जीन्स घट्ट किंवा रंगाने फिकट होते. ती जीन्स परिधान करण्यापेक्षा आपण नवीन पॅटर्नच्या जीन्स विकत घेतो. त्यानंतर आपण जुन्या जीन्सकडे पाहत देखील नाही. जुन्या जीन्स फेकण्यापेक्षा आपण त्याच्यापासून विविध भन्नाट वस्तू बनवू शकता. ज्यामुळे घर सुंदर दिसेल यासह वापरण्यात देखील येईल.2 / 9जीन्सला अनेक खिसे असतात. आपण त्या खिश्यांपासून किल्ली स्टँड बनवू शकता. ते सर्व खिसे एकाच कापडावर एकत्रितपणे जोडून आपण खास किल्ली स्टँड बनवू शकता, यासह मोबाईल स्टॅंडदेखील बनवू शकता.3 / 9मोबाईल चार्जिंगला लावल्यावर अनेकदा तो ठेवायचा कुठे असा प्रश्न पडतो. आजूबाजूला काही नसेल तर भिंतीचा आधार घ्यावा लागतो. अशातच आपण जीन्सपासून सोपी आणि सुरक्षित मोबाईल चार्जिंग बॅग बनवू शकता. 4 / 9आपण जुन्या जीन्सपासून विविध डिझाईनचे डोअरमॅट तयार करू शकता. ब्लू आणि ब्लॅक जीन्स प्रत्येकाकडे असतेच. जर त्या जुन्या झाल्या असतील. तर त्यांना डिझायनर लूक देऊन डोअरमॅट तयार करा.5 / 9हिवाळ्यात फरशीवर पाय ठेवले की खूप थंड लागतात. या थंडीपासून स्वतःच्या पायांना आराम द्यायचा असेल. तर जुन्या जीन्सपासून बूट अथवा चप्पल तयार करा. जे आपल्याला घरात वापरता येईल.6 / 9घरी जेवण बनवत असताना कपड्यांवर जेवणाचे डाग पडतात. या डागांपासून कपड्यांना वाचवायचे असेल. तर, जुन्या जीन्सचा वापर करून सुंदर किचन एप्रन बनवू शकता. 7 / 9घरात डब्ब्यांना कव्हर करण्यासाठी आपण बाजारातून महागडे कव्हर आणतो. यापेक्षा आपण जुन्या जीन्सना योग्य आकार देऊन बॉक्स कव्हर बनवू शकता. हे कव्हर खराब झाल्यानंतर आपल्याला धुताही येईल.8 / 9जुन्या जीन्सचा योग्य वापर आपण पर्स बनवून करू शकता. स्टायलिश पर्सला आपण विविध डिझाईन देऊन आकर्षक बनवू शकता. दिसायला हटके आणि स्टायलिश पर्स आपल्याला एक नवीन लूक देईल.9 / 9बॉटल बॅग ही गरजेची वस्तू आहे. पण त्यासाठी बॅगमध्ये जागा नसते. त्यामुळे बॉटल बाहेरून विकत घेतली जाते. पण आता बॉटल बॅगमुळे तुम्हाला विनाकारण खर्च करण्याची गरज नाही. जीन्सपासून बनवलेल्या बॅग्स बाटली ठेवण्यास आणि ती सोबत नेण्यास आरामदायक आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications