Join us

Women's Day 2025 : ‘या’ ७ देशांमध्ये साजरा केला जात नाही महिला दिन! वाचा, कारण काय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2025 20:03 IST

1 / 9
महिलांच्या सामाजिक योगदानासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी म्हणून महिला दिन साजरा केला जाते. जागतिक स्तरावर ८ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
2 / 9
मात्र असे काही देश आहेत ज्या देशांमध्ये महिला दिन साजरा करत नाही किंवा त्याचा विरोधच केला जातो.(फोटो क्रेडिट : गुगल)
3 / 9
अमेरिका प्रगत देश असला तरी या देशामध्ये महिला दिनाला काही फार महत्व दिले जात नाही. अमेरिकन राजकारणात महिलांना फार स्थान नाही, त्यामुळे विविध ॲक्टिव्हिस्ट हा दिवस साजरा करतात पण शासन स्तरावर त्याला मान्यता नाही. आतंराष्ट्रीय संस्थाच तिथे महिला दिन साजरा करतात.
4 / 9
मेक्सिकोमध्ये पूर्वी महिला दिन साजरा केला जात असे. पण काही कारणांमुळे आता महिला दिनाला होणाऱ्या सोहळ्याची जागा आंदोलनांनी घेतली आहे. मोक्सिकोमध्ये महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध यादिवशी अधिक बोलले जाते.
5 / 9
तालिबानींनी अफगाणिस्तानवर वर्चस्व गाजवल्यापासून तेथे महिलांना बोलण्याचेही स्वातंत्र्य उरलेले नाही. महिला दिनच काय इतरही काही साजरे करण्याची महिलांना परवानगी नाही. त्यांनी प्रयत्न केला तरी महिलांना अमानुष शिक्षा केली जाते.
6 / 9
इराणमध्ये महिला दिन साजरा करणे नियमात बसत नाही. असे सरकारमार्फत सांगितले जाते. ज्या महिलांनी असे काही करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना कैद करण्यात येते. महिलांमार्फत केल्या जाणाऱ्या आंदोलनांमध्ये महिलांवर मारहाणही केली जाते.
7 / 9
सध्या सौदीमध्ये महिलांची स्तिथी जरा बरी आहे. मात्र महिला दिन येथे सरकारमान्य नाही. लहानसे वैयक्तिक कार्यक्रम मात्र होतात.
8 / 9
महिलांना अनेक अधिकार या देशात नाहीत. घटस्फोटासाठीही त्यांना मान्यता नाही. महिला दिन हा कुटुंब दिन म्हणून इस्त्राइलमध्ये साजरा केला जातो. कारण स्त्री-पुरुष समानता हा येथे वादाचा मुद्दा आहे.
9 / 9
पाकिस्तानमध्ये महिला दिनावर बंदी नाही. गेली काही वर्षे तिथे विमेन मार्च काढणाऱ्या महिलांची टिंगलच अधिक केली जाते. (महिला दिन माहिती संदर्भ : शी द पिपल, इन्स्टाग्राम पेज)
टॅग्स : महिला दिन २०२५महिलापाकिस्तानतालिबानसौदी अरेबियाअमेरिकाजागतिक महिला दिन