World cancer day: 'कॅन्सर झाला म्हणून जगणं संपत नाही!'- कॅन्सरला हरवून नवं जगणं घडवणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री

Published:February 4, 2022 03:29 PM2022-02-04T15:29:24+5:302022-02-04T17:00:01+5:30

World cancer day: 'कॅन्सर झाला म्हणून जगणं संपत नाही!'- कॅन्सरला हरवून नवं जगणं घडवणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री

१. मनिषा कोईराला- ''I like to call myself as cancer crusader. Its basically an attitude..'' असं म्हणत अभिनेत्री मनिषा कोईराला हिने मोठ्या हिमतीने तिचा आजार स्वीकारला आणि त्यावर मात केली.. २०१२ साली मनिषाला ओव्हेरियन कॅन्सर असल्याचे निदान झाले. न्यूयॉर्कमध्ये अनेक वर्ष तिने यावर उपचार घेतले. त्यातून बाहेर पडल्यावर कॅन्सर जनजागृती मोहीम व्यापक प्रमाणावर राबवली आणि या काळातले तिचे अनुभव, तिला मिळालेले प्रेम, तिची सकारात्मकता या सगळ्या गोष्टी पुस्तकरूपात शब्दबद्ध केल्या.

World cancer day: 'कॅन्सर झाला म्हणून जगणं संपत नाही!'- कॅन्सरला हरवून नवं जगणं घडवणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री

२. सोनाली बेंद्रे- आपल्या गोड हास्याने अनेकांची मने जिंकून घेणाऱ्या अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला २०१८ साली कॅन्सरने पछाडले. या आजाराने तिला त्रास, वेदना भरपूर दिल्या. पण तरीही तिच्या चेहऱ्यावरचे हास्य मात्र कधीच मावळले नाही. सोनालीने तिच्या ट्रिटमेंटचे सगळेच फोटो कायम तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले. ‘This journey has taught me so much’ असं ती कायमच म्हणत आली.

World cancer day: 'कॅन्सर झाला म्हणून जगणं संपत नाही!'- कॅन्सरला हरवून नवं जगणं घडवणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री

३. लिसा रे- अभिनेत्री लिसा रे हिला २००९ साली ब्लड कॅन्सर झाला. आपला आजार न लपवता तो सांगण्याची आणि त्याचे फोटो सोशल मिडियावर शेअर करण्याची हिंमत पहिल्यांदा तिनेच दाखवली असं म्हटलं जातं. आजारातून बाहेर आल्यानंतर तिने याबाबत बरीच जनजागृती केली. कॅन्सरचे निदान ते उपचार हा तिचा अनुभव सांगणारं ‘Close To The Bone: A Memoir’ हे पुस्तकही तिने लिहिलं.

World cancer day: 'कॅन्सर झाला म्हणून जगणं संपत नाही!'- कॅन्सरला हरवून नवं जगणं घडवणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री

४. बार्बरा मोरी- काईट्स चित्रपटात हृतिक रोशनसोबत चमकलेली अभिनेत्री म्हणजे बार्बरा मोरी. २००७ साली तिला स्तनाचा कर्करोग झाला होता. आजारातून बाहेर पडल्यानंतर तिने या विषयी महिलांमध्ये बरेच उपक्रम राबविले आणि जनजागृती केली. अनेक जणींसाठी ती एक प्रेरणा ठरली आहे.

World cancer day: 'कॅन्सर झाला म्हणून जगणं संपत नाही!'- कॅन्सरला हरवून नवं जगणं घडवणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री

५. ताहिरा कश्यप- २०१८ साली निर्माती, लेखिका असणाऱ्या ताहिरा कश्यप हिला स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. ताहिरा ही अभिनेता आयुषमान खुराणा याची पत्नी. आपल्या या आजाराचा फायदा तिने इतर कॅन्सरग्रस्त लोकांना नवी उमेद देण्यासाठी, कॅन्सरविरूद्ध लढण्याचे बळ देण्यासाठी करून घेता.

World cancer day: 'कॅन्सर झाला म्हणून जगणं संपत नाही!'- कॅन्सरला हरवून नवं जगणं घडवणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री

६. हमसा नंदिनी- गोड चेहऱ्याच्या या तेलगू अभिनेत्रीला मागच्याच वर्षी ब्रेस्ट कॅन्सरने ग्रासले. पण तरीही ती जराही डगमगली नाही. तिनेही तिच्या ट्रिटमेंटचे, कॅन्सरच्या उपचारांचे फोटो मोठ्या धाडसाने तिच्या चाहत्यांसोबत सोशल मिडियावर शेअर केले... सध्या तिच्यावर केमोथेरपीचे उपचार सुरू आहेत.

World cancer day: 'कॅन्सर झाला म्हणून जगणं संपत नाही!'- कॅन्सरला हरवून नवं जगणं घडवणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री

७. किरण खेर- गालावरची गोड खळी आणि चेहऱ्यावर कायम सुमधूर हास्य हे किरण खेर यांचे वैशिष्ट्य.. २०२१ या वर्षीच त्यांना ब्लड कॅन्सर असल्याचे समजले. त्यांच्यावर सध्याही उपचार सुरू आहेत. पण तरीही आजारपण बाजूला ठेवून त्या आताही छोट्या पडद्यावरील एका कार्यक्रमाचे परीक्षण करत आहेत.. आजार कितीही मोठा असला तरी त्यापुढे माझी जिद्द मोठी आहे, याचे यापेक्षा दुसरे उत्तम उदाहरण नाही.

World cancer day: 'कॅन्सर झाला म्हणून जगणं संपत नाही!'- कॅन्सरला हरवून नवं जगणं घडवणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री

८. नाफिसा अली- अभिनेत्री नाफिसा अली यांना २०१८ मध्ये ओव्हेरियन कॅन्सर झाला होता. आता त्या यातून पुर्णपणे बाहेर आल्या आहेत. आजारपणाच्या काळात आणि आता सुद्धा त्या या आजाराबाबत त्यांच्याकडून होईल तशी जनजागृती करत असतात.