नाश्त्यामध्ये चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका! पौष्टिक वाटत असले तरी पोटासाठी आहेत अतिशय घातक
Updated:January 21, 2025 15:02 IST2025-01-21T14:56:31+5:302025-01-21T15:02:25+5:30

हल्ली डाएट करणारे अनेक जण आहेत. त्यापैकी बऱ्याच जणांच्या डाएट प्लॅनमध्ये असे काही पदार्थ आहेत ज्यांची नावं आपल्याला फारशी माहिती नसतात किंवा ते आपण आपल्या स्वयंपाक घरात सहजपणे करू शकत नाहीत.(4 food you must avoid in breakfast)
पण असे काही पदार्थ पौष्टिक वाटत असले किंवा त्यांची तशी जाहिरात करण्यात येत असली तरी ते तुमच्या तब्येतीसाठी आणि विशेषत: पोटाच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत, असं डॉ. सौरभ सेठी सांगतात. त्यांनी दिलेली माहिती SurreyLive या साईटवर प्रकाशित करण्यात आली असून त्यांनी काही पदार्थ चुकूनही नाश्त्यामध्ये घेऊ नयेत असं सांगितलं आहे. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहूया...
हल्ली वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणारे अनेकजण बाजारात विकत मिळणारे पॅकबंद सिरिल्स (cereals) खाण्यावर भर देतात. पण ते पोटासाठी अजिबातच चांगले नाहीत कारण त्यांच्यामध्ये खूपच जास्त प्रमाणात साखर असते, असं डॉक्टर सांगतात.
सध्या दुकानांमध्ये विकत मिळणारा ग्रॅनोला Granola हा पॅकबंद पदार्थही खूप खाल्ला जातो. ओट्स, सुकामेवा, वेगवेगळ्या पौष्टिक बिया, मध आणि सुकामेवा घालून हा पदार्थ तयार केला जातो. पण तो रोजच खाणं योग्य नाही. कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात साखर, प्रिझर्व्हेटीव्ह असतात. त्यामुळे ते पौष्टिक समजून रोजच खाणं अजिबातच योग्य नाही.
काही जणांच्या नाश्त्यामध्ये पॅनकेक सुद्धा असतात. ते नाश्त्यामध्ये खाणं मुळीच योग्य नाही, असं डॉक्टर सांगतात.
काही पालक त्यांच्या मुलांना सकाळी डोनट खाऊ घालतात. किंवा शाळेचा जो खाऊचा छोटा डबा असतो त्यात डोनट देतात. त्यात मैदा, साखर, तेल यांचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे असा जड पदार्थ नाश्त्यामध्ये तरी मुळीच देऊ नये.