हिमोग्लोबिन वाढतच नाही? ४ गारेगार ज्यूस प्या, अशक्तपणा जाईल- अंगातलं रक्त वाढून ताकद येईल By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2024 9:18 AM 1 / 7हिमोग्लोबिन कमी असण्याची तक्रार बहुतांश महिलांमध्ये आढळून येते. शरीरातलं लोह कमी झालं असेल तर अंगात ताकद राहात नाही. अशक्तपणा येतो. थोडी मेहनत झाली तरी लगेच गळून गेल्यासारखं होतं.2 / 7म्हणूनच लोह किंवा हिमोग्लोबिन वाढण्यासाठी काही पदार्थ आवर्जून आहारात घेतले पाहिजेत. सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे मग नेहमीच थंडगार काहीतरी पिण्याची इच्छा होते. खरंतर जेवणापेक्षा सरबत, ज्यूस, ताक प्यावं असंच वाटतं. 3 / 7याच संधीचा फायदा घ्या आणि भरपूर लोह देणारे हे काही गारेगार ज्यूस किंवा सरबत उन्हाळ्यात नियमितपणे प्या... काही दिवसांतच हिमोग्लोबिनमध्ये खूप चांगली वाढ दिसून येईल. 4 / 7यापैकी सगळ्यात पहिला ज्यूस किंवा सरबत आहे ते बीटरूटचं. बीटमध्ये लोहसोबतच फोलेट, मँगनीज, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि बेटाईन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रक्तपेशींशी ऑक्सिजन शोषून घेण्याची क्षमता वाढते. 5 / 7काळ्या मनुका म्हणजेच prunes अतिशय आरोग्यदायी असतात. एक कप भर जरी तुम्ही काळ्या मनुकांचा ज्यूस घेला तरी त्यातून तुम्हाला २.८ एमजी एवढं लोह मिळतं. काळ्या मनुका पाण्यामध्ये ७ ते ८ तास भिजवून तुम्ही हा ज्यूस करू शकता.6 / 7पुदिन्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात लोह असतं. जर तुम्ही १०० ग्रॅम पुदिन्याची पानं घेतली तर त्यातून तुम्हाला १६ मिलीग्रॅम एवढं लोह मिळू शकतं. तुमच्या आवडीचे पदार्थ घालून तुम्ही या पुदिन्याच्या ज्यूसला अधिक चटपटीतही करू शकता.7 / 7खजूराचा मिल्कशेक करून प्यायल्यानेही तुम्हाला भरपूर लोह मिळेल. यामध्ये तुम्ही बदाम, काजू, तीळ असा इतर सुकामेवाही टाकू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications