महागड्या प्रोटीन शेकमध्ये कशाला पैसे घालवता? ४ स्वस्तात मस्त पदार्थ खा, भरपूर प्रोटीन्स मिळतील

Updated:January 31, 2025 09:25 IST2025-01-31T09:20:52+5:302025-01-31T09:25:01+5:30

महागड्या प्रोटीन शेकमध्ये कशाला पैसे घालवता? ४ स्वस्तात मस्त पदार्थ खा, भरपूर प्रोटीन्स मिळतील

प्रोटीन शेक पिणे आता एक प्रकारचे फॅड झाले आहे. आपल्या आरोग्याच्या बाबतीत जागरुक असणं खूप गरजेचं आहे. पण ते फक्त बाजारात मिळणाऱ्या महागड्या पदार्थांमधूनच मिळतं असं मात्र मुळीच नाही.(4 protein rich food)

महागड्या प्रोटीन शेकमध्ये कशाला पैसे घालवता? ४ स्वस्तात मस्त पदार्थ खा, भरपूर प्रोटीन्स मिळतील

बहुतांश लोकांच्या शरीरात प्रोटीन्सची कमतरता असते (how to get rid of protein deficiency?) आणि ती भरून काढण्यासाठी अनेक जण बाजारात विकत मिळणारे महागडे प्रोटीन शेक पितात. पण खरंतर आपल्या स्वयंपाक घरातच असे कित्येक पदार्थ आहेत जे आपण दररोज पुरेशा प्रमाणात खाल्ले तर शरीरातली प्रोटीन्सची गरज पुर्णपणे भागवता येते. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहा..(4 protein rich super food)

महागड्या प्रोटीन शेकमध्ये कशाला पैसे घालवता? ४ स्वस्तात मस्त पदार्थ खा, भरपूर प्रोटीन्स मिळतील

आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल सांगतात की भरपूर प्रोटीन्स देणारा पहिला पदार्थ आहे छोले किंवा चणे. जर तुम्ही १ कप भिजवून शिजवलेले चणे खाल्ले तर त्यातून तुम्हाला जवळपास १४. ५ ग्रॅम एवढे प्रोटीन्स मिळतात. शिवाय त्यातून खूप चांगल्या प्रमाणात फायबरसुद्धा मिळते.

महागड्या प्रोटीन शेकमध्ये कशाला पैसे घालवता? ४ स्वस्तात मस्त पदार्थ खा, भरपूर प्रोटीन्स मिळतील

मसूर डाळ हा सुद्धा प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत मानला जातो. १ कप मसूर डाळीतून जवळपास १७. ९ ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.

महागड्या प्रोटीन शेकमध्ये कशाला पैसे घालवता? ४ स्वस्तात मस्त पदार्थ खा, भरपूर प्रोटीन्स मिळतील

१ कप राजमा खाल्ल्यास त्यातून १५. ३ ग्रॅम प्रोटीन्स मिळते. शिवाय राजमामध्ये फायबरसुद्धा भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींसाठीही राजमा खाणे फायदेशीर ठरते.

महागड्या प्रोटीन शेकमध्ये कशाला पैसे घालवता? ४ स्वस्तात मस्त पदार्थ खा, भरपूर प्रोटीन्स मिळतील

ज्या लोकांच्या शरीरात प्रोटीन्सची खूप कमतरता आहे त्यांनी दररोज मुगाच्या डाळीचे वरण खावे. मुगाची डाळ पचायलाही हलकी असते. त्यामुळे ज्यांना वारंवार अपचन, ॲसिडीटी होते, त्यांच्यासाठीही मुगाची डाळ खाणे फायदेशीर आहेे.