गुळाचा चहा नेहमीचाच... आता गुळाचं पाणी पिऊन बघा, इम्युनिटी वाढविण्यासह ५ जबरदस्त फायदे By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2022 5:35 PM 1 / 8१. गूळ आणि त्याचे आरोग्यदायी फायदे याविषयी तर आपण नेहमीच ऐकतो. पण बऱ्याच जणांना गूळ उष्ण असल्याने सहन होत नाही. म्हणूनच ज्यांना आता उष्ण असल्याने गूळ सहन होत नाही, त्यांनी या वेगळ्या पद्धतीने गूळ खाऊन बघावा.2 / 8२. गुळाचा चहा सध्या खूप गाजत आहे. अनेक जणांना गोड चहा तर पाहिजे असतो. पण चहात साखर मात्र नको असते. अशा सर्वांसाठीच आरोग्यदायी तसेच चवदार चहा म्हणजे गुळाचा चहा. चहा न घेता गुळाचं गरम पाणी घेतलं तरी त्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासह इतरही अनेक फायदे होतात, असं आहारतज्ज्ञ सोनिया बक्षी यांनी एचटी लाईफस्टाईलशी बोलताना सांगितलं.3 / 8३. गुळाचं पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाणी पातेल्यात गरम करायला ठेवा. त्यात १ इंच गुळाचा खडा टाका. २ ते ३ मिनिटे पाणी मध्यम आचेवर उकळू द्या. त्यानंतर ते पाणी कोमट झालं की पिऊन घ्या. रोज सकाळी हा उपाय करावा.4 / 8४. गुळातून सोडियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात मिळतं त्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी या उपायाचा फायदा होतो.5 / 8५. गुळामध्ये लोह आणि फोलेट भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे ज्यांचं हिमोग्लोबिन नेहमीच कमी असतं अशा लोकांसाठी त्यांचा फायदा होतो. अशक्तपणा कमी होतो.6 / 8६. गुळामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे शरीराचा electrolyte balance राखण्यासाठी त्याचा उपयोग होताे. यामुळे शरीरावर आलेली अतिरिक्त सूज म्हणजेच इन्फ्लामेशन कमी होऊन वेटलॉस होण्यासाठी मदत होते.7 / 8७. मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी १, बी ६, सी तसेच ॲण्टीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स गुळामध्ये योग्य प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी गुळाच्या पाण्याचा फायदा होतो. 8 / 8८. नॅचरल बॉडी डिटॉक्स ड्रिंक म्हणूनही गुळाचं पाणी उपयुक्त ठरतं. त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications