5 calcium rich food and drinks other than milk, super food for calcium, calcium rich food
दूध आवडत नाही? 'हे' ५ पदार्थ प्या, भरपूर कॅल्शियम मिळेल- आयुष्यभर हाडं राहतील ठणठणीतPublished:December 3, 2024 12:13 PM2024-12-03T12:13:32+5:302024-12-03T14:46:06+5:30Join usJoin usNext दूध हा कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे हे आपल्याला माहिती आहे. पण अनेक जणांना दूध प्यायला आवडत नाही. बरीच लहान मुलंही दूध प्यायचा कंटाळा करतात. म्हणूनच फक्त कॅल्शियम मिळावं म्हणून दूध बळजबरीने पित असाल तर त्याला पर्याय म्हणून या काही कॅल्शियमयुक्त पदार्थांचा नक्कीच विचार करू शकता. चिया सीड्सा हा कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. त्यामुळे रात्री चिया सीड्स पाण्यात भिजत घाला आणि दुसऱ्यादिवशी ते पाणी प्या. किंवा वेगवेगळ्या ज्यूस, स्मूदी यांच्या माध्यमातूनही तुम्ही चिया सीड्स खाऊ शकता. बदाम दूध, सोया मिल्क, ओट्स मिल्क या माध्यमातूनही भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते. कॅल्शियमसाठी योगर्ट स्मूदी या चवदार पदार्थाचाही विचार करू शकता. कारण योगर्ट हा कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत मानला जातो. ताज्या मोसंबीचा फ्रेश रस प्यायल्यानेही चांगल्या प्रमाणात कॅल्शियम मिळते. तीळ, भोपळ्याच्या बिया, सुर्यफुलाच्या बिया घालून जर तुम्ही अंजीर शेक केला तर तो देखील तुम्हाला भरपूर कॅल्शियम देईल. कारण तीळ आणि अंजीर कॅल्शियमचे खूप चांगले स्त्रोेत आहेत. टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सअन्नदूधWeight Loss TipsHealthHealth Tipsfoodmilk