वजन वाढू नये यासाठी ५ सवयी स्वत:ला लावून घ्या- बॉडी होईल डिटॉक्स- वाचा आहारतज्ज्ञांचा सल्ला By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2023 3:26 PM 1 / 8वाढतं वजन ही बहुसंख्य लाेकांसमोरची समस्या. कारण हल्ली आपली लाईफस्टाईल पुर्णपणे बदलून गेली आहे. कामाच्या पद्धती आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये खूप बदल झाला आहे.2 / 8त्यामुळेच शरीर नॅचरली डिटॉक्स करण्यासाठी आणि वजन वाढू नये यासाठी कोणत्या सवयी स्वत:ला लावून घेणं गरजेचं आहे, याविषयीची एक पोस्ट सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.3 / 8यामध्ये त्यांनी सांगितलेले Detox mantra तुम्ही अगदी पाठ करून टाका आणि रोज त्याचा अवलंब करा. जेणेकरून वजन कमी करण्यासाठीही भरपूर मदत होईल.4 / 8यापैकी त्यांनी सांगितलेला पहिला मंत्र म्हणजे व्यायामासाठी तुमच्यासोयीची कोणतीही वेळ फायद्याचीच असते. त्यामुळे तुम्हाला जमेल त्या वेळी जमेल तो व्यायाम करा... तोच तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.5 / 8विकतचे पदार्थ खाणं कमी करा. घरच्याघरी रोज स्वयंपाक करून जेवा.6 / 8स्क्रिन टाईम कमी करा आणि रात्री लवकर झोपा.7 / 8सकाळी लवकर उठा आणि तुमचा दिवस लवकरात लवकर सुरू करा. 8 / 8प्रसिद्धी मिळविण्यासाठी हॅशटॅग असतात. पण आरोग्य मिळविण्यासाठी असे कोणतेही हॅशटॅग किंवा शॉर्टकट नसतात...ऋजुता यांनी सांगितलेले हे ५ मंत्र जर लक्षात ठेवले तर नक्कीच उत्तम आरोग्य राखता येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications