कितीही पौष्टिक असले तरी रात्रीच्या जेवणात 'हे' पदार्थ खाणं टाळा- तब्येत बिघडून वजनही वाढेल

Updated:January 18, 2025 13:34 IST2025-01-18T13:28:18+5:302025-01-18T13:34:39+5:30

कितीही पौष्टिक असले तरी रात्रीच्या जेवणात 'हे' पदार्थ खाणं टाळा- तब्येत बिघडून वजनही वाढेल

आपल्याला माहितीच आहे की रात्रीच्या जेवणात कोणतेही जड पदार्थ घेऊ नयेत. त्यामुळे तसे पदार्थ रात्री खाणं तर आपण टाळतोच.(5 food you should avoid in dinner)

कितीही पौष्टिक असले तरी रात्रीच्या जेवणात 'हे' पदार्थ खाणं टाळा- तब्येत बिघडून वजनही वाढेल

पण त्याशिवाय इतरही असे काही पदार्थ आहेत जे आरोग्यासाठी खूप पौष्टिक असले तरीही रात्रीच्या जेवणात ते खाणं पुर्णपणे टाळलं पाहिजे. असे पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी sakshilalwani_nutritionist या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.(Avoid These 5 Foods at Dinner for Better Digestion )

कितीही पौष्टिक असले तरी रात्रीच्या जेवणात 'हे' पदार्थ खाणं टाळा- तब्येत बिघडून वजनही वाढेल

त्यापैकी पहिला पदार्थ आहे पालक. पालकामध्ये पचनासाठी थोडे कठीण असणारे फायबर आणि लोह असते. त्यामुळे रात्रीच्या जेवणात जर पालकाचा पदार्थ खाल्ला तर त्यामुळे पोट फुगणे, अपचन असा त्रास होऊ शकतो.

कितीही पौष्टिक असले तरी रात्रीच्या जेवणात 'हे' पदार्थ खाणं टाळा- तब्येत बिघडून वजनही वाढेल

दुसरा पदार्थ आहे फळं किंवा फळांचा रस, फ्रुट सलाड असे पदार्थ. फळांमध्ये असणाऱ्या साखरेमुळे रात्रीच्यावेळी पोट जड होण्याचा त्रास होऊ शकतो आणि त्याचा परिणाम झोपेवरही होतो.

कितीही पौष्टिक असले तरी रात्रीच्या जेवणात 'हे' पदार्थ खाणं टाळा- तब्येत बिघडून वजनही वाढेल

रात्रीच्या जेवणात कच्ची काकडी, कच्चे बीटरूट असे पदार्थ खाणंही टाळावं. कारण रात्रीच्यावेळी पचनशक्ती आधीच मंदावलेली असते. त्यात जर असे थंड पदार्थ खाल्ले तर पचनक्रिया आणखीनच बिघडते.

कितीही पौष्टिक असले तरी रात्रीच्या जेवणात 'हे' पदार्थ खाणं टाळा- तब्येत बिघडून वजनही वाढेल

नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणात कडधान्य खाणं योग्य आहे. पण रात्री जर तुम्ही ते खाल्ले तर त्यामुळे गॅसेसचा त्रास होऊन पोट दुखू शकते.

कितीही पौष्टिक असले तरी रात्रीच्या जेवणात 'हे' पदार्थ खाणं टाळा- तब्येत बिघडून वजनही वाढेल

रात्रीच्या वेळी दही खाल्ले तर त्यामुळे शरीरात कफ तयार होऊ शकतो. तसेच रात्रीच्या वेळी दही खाल्ल्याने अन्नपचन व्यवस्थित होत नाही.