गुपचूप शुगर वाढवणारे ५ पदार्थ; गोड खाणं टाळता पण ‘हे’ पदार्थ खाता? फसताय तुम्ही..

Updated:February 3, 2025 16:32 IST2025-02-03T12:06:48+5:302025-02-03T16:32:59+5:30

गुपचूप शुगर वाढवणारे ५ पदार्थ; गोड खाणं टाळता पण ‘हे’ पदार्थ खाता? फसताय तुम्ही..

वजन, शुगर वाढू नये यासाठी अनेकजण गोड पदार्थ खाणं टाळतात. पण असे काही पदार्थ आहेत जे खाल्ल्यामुळे तुमचं वजन आणि रक्तातील साखरही वाढू शकते. पण ते पदार्थ खात असताना ही गोष्ट मात्र आपल्या अजिबात लक्षात येत नाही. असे पदार्थ नेमके कोणते आहेत ते पाहूया..(5 foods that can silenty increase your weight and sugar)

गुपचूप शुगर वाढवणारे ५ पदार्थ; गोड खाणं टाळता पण ‘हे’ पदार्थ खाता? फसताय तुम्ही..

सगळ्यात पहिला पदार्थ आहे काही आंबट- गोड चटण्या. टोमॅटो, चिंच, कवठ अशा काही चटण्यांमध्ये हमखास गूळ असतोच. या चटण्या आपण अगदी आवडीने खातो.

गुपचूप शुगर वाढवणारे ५ पदार्थ; गोड खाणं टाळता पण ‘हे’ पदार्थ खाता? फसताय तुम्ही..

दुसरा पदार्थ आहे वेगवेगळ्या प्रकारची लोणची. जेवणाची मजा वाढविण्यासाठी लोणची अगदी आवडीने खाल्ली जातात. काही लोणची पचनासाठी अतिशय चांगली पण असतात. पण हल्ली बाजारात मिळणारी जी लोणची असतात त्यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात तेल, मीठ, प्रिझर्व्हेटीव्ह असतात.

गुपचूप शुगर वाढवणारे ५ पदार्थ; गोड खाणं टाळता पण ‘हे’ पदार्थ खाता? फसताय तुम्ही..

नकळतपणे वजन वाढविणारा तिसरा पदार्थ आहे वेगवेगळ्या प्रकारचे विकत मिळणारे ड्रिंक्स. हे ड्रिंक्स हेल्दी आहेत म्हणून त्यांची जाहिरात केली जात असली तरी त्यांच्यामधील बहुतांश ड्रिंक्समधून खूप जास्त कॅलरी शरीरात जातात.

गुपचूप शुगर वाढवणारे ५ पदार्थ; गोड खाणं टाळता पण ‘हे’ पदार्थ खाता? फसताय तुम्ही..

काही जणांना दररोज दुपारच्या जेवणात ताक पिण्याची किंवा दही खाण्याची सवय असते. हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी चांगलेच आहेत. पण बरेच जण त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात साखर किंवा मीठ घालतात.

गुपचूप शुगर वाढवणारे ५ पदार्थ; गोड खाणं टाळता पण ‘हे’ पदार्थ खाता? फसताय तुम्ही..

पुरी, पराठे आपण नेहमीच खातो. पण त्यांच्यामधून खूप जास्त प्रमाणात तेल किंवा तूप पोटात जात नाही ना याचा विचारही करायला हवा.