5 mistakes while taking lunch responsible for weight gain, weight loss tips to follow during lunch
दुपारच्या जेवणात ५ चुका कराल तर व्यायाम करूनही वजन घटणार नाही, पोट-वजन कमी करायचं तर...Published:July 10, 2024 09:05 AM2024-07-10T09:05:49+5:302024-07-10T09:10:01+5:30Join usJoin usNext नियमित व्यायाम करूनही काही लोकांचा पोटाचा घेर, वाढलेलं वजन काही कमी होत नाही. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर तुम्हीही पुढे सांगितलेल्या ५ चुका तर करत नाही ना हे एकदा तपासून पाहा... सकाळचा नाश्ता हा जसा अतिशय महत्त्वाचा असतो, तसंच दुपारच्या जेवणाचं. म्हणूनच वजन कमी करायचं असेल तर दुपारचं जेवण करताना काही चुका कटाक्षाने टाळल्याच पाहिजेत. घरी राहणाऱ्या गृहिणींच्या बाबतीत बऱ्याचदा असं होतं की त्यांची जेवणाची वेळ अनेकदा चुकते. मग जेव्हा कडाडून भूक लागते तेव्हा त्या जेवायला बसतात आणि मग खूप भूक लागलेली असल्याने घाईमध्ये गरजेपेक्षा जास्त जेवतात. वजन वाढण्याची ही पहिली चूक टाळा. दुपारच्या जेवणाची वेळ होत येईपर्यंत अनेकांना खूप भूक लागलेली असते. शिवाय जे लोक वर्किंग असतात त्यांना तर कमी वेळात जेवायचे असते. त्यामुळे मग जे काही समोर येईल ते गपागप खाण्याकडे अनेकांचा कल असतो. यामुळे अन्न व्यवस्थित चावले जात नाही. त्यामुळे त्याचे पचन, चयापचय व्यवस्थित न झाल्याने शरीरावर चरबी जमा होण्याचे प्रमाणे वाढते. आपला दुपारचा आहार जेवढा आहे तेवढंच जेवा. समोर दिसलं म्हणून खायचं किंवा संपवायचं म्हणून खायचं असं करू नका. जेवत असताना पुढच्या कामाचं टेन्शन घेऊन जेवू नका. मन शांत करून जेवणावर एकाग्र करून जेवा. वजन कमी करायचं म्हणून दुपारचं जेवण टाळणं किंवा भुकेपेक्षा खूप कमी जेवणे असं करू नका. कारण त्यामुळे मग दिवसभर खूप खा खा होते. कमी जेवायचं असेल तर आहारतज्ज्ञांकडून तसा डाएट प्लॅन करून घ्या. टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नहेल्थ टिप्सWeight Loss TipsfoodHealth Tips