चरबी घटून सुटलेलं पोट होईल एकदम सपाट, फिटनेस ट्रेनर सांगतात ५ सोप्या ट्रिक्स-करुन पाहा
Updated:January 30, 2025 13:39 IST2025-01-30T12:01:18+5:302025-01-30T13:39:16+5:30

सुटलेलं पोट कसं कमी करावं हा प्रश्न अनेकांना सध्या छळत आहे. कारण बाकी शरीर तर प्रमाणात आहे (how to reduce belly fat?). पण पोटावरची चरबी मात्र काही केल्या कमी होत नाही.(5 simple tricks for flat tummy)
तुमचीही हीच अडचण असेल तर त्यासाठी नेमका काय उपाय करावा, याविषयीची माहिती फिटनेस ट्रेनर जिना अमिन यांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे (simple and easy weight loss tips). त्यामध्ये त्यांनी पोटावरची चरबी कमी करायची असेल तर ५ गोष्टी आवर्जून करा, असं सुचवलं आहे.(weight control tips by fitness trainer)
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी त्यांनी सांगितलेला सगळ्यात पहिला उपाय म्हणजे बाजारात मिळणारे हेल्थ ड्रिंक, एनर्जी ड्रिंक पिणं बंद करा. कारण या ड्रिंकमध्ये खूप जास्त प्रमाणात साखर आणि प्रिझर्व्हेटीव्ह असतात. त्यामुळे त्याने खूप लवकर वजन वाढते आणि एनर्जी ड्रिंक म्हणून आपण ते पित असल्याने त्याचा हा धोका आपल्या लक्षातही येत नाही.
कोणताही पदार्थ खाताना तो नेहमी ठराविक प्रमाणातच खा. कार्बोहायड्रेट्स, भात, बटाटा असे पदार्थ खायलाही हरकत नाही. पण ते योग्य प्रमाणातच हवे.
कॅलरीचा अतिरेक टाळणे. तुमचे शरीराला जेवढ्या कॅलरीची गरज आहे तेवढ्याच कॅलरी पोटात जाऊ देणे ही गोष्ट वजन कमी करण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे कॅलरी किती प्रमाणात तुमच्या पोटात जात आहेत, याकडे कटाक्षाने लक्ष द्या.
काही लोक खूप भराभर जेवतात. किंवा काही लोक कोणती ना कोणती स्क्रिन पाहात खातात. या दोन्ही गोष्टींमध्ये आपले जेवणाकडे लक्ष नसते. त्यामुळे पोट भरल्याचं सिग्नल मेंदूने दिलं तरी आपलं त्याकडे मुळीच लक्ष नसतं आणि त्या नादात आपण गरजेपेक्षा जास्त खातो. त्यामुळे लक्ष देऊन एकाग्र चित्ताने जेवा. जेवणाचा आनंद घ्या.
नुसतं डाएट करून वजन किंवा सुटलेलं पोट कमी होणार नाही. त्याच्या जोडीला व्यायाम करावाच लागेल. त्यामुळे योग्य तो व्यायामही नियमितपणे करा, असा सल्ला फिटनेस ट्रेनर देतात.