व्यायाम करूनही वजन कमी होईना? 'हा' चहा पिऊन बघा, मेटाबॉलिझम सुधारून वजन घटेल भराभर
Updated:March 22, 2025 12:57 IST2025-03-22T12:47:44+5:302025-03-22T12:57:44+5:30

काही जण नियमितपणे व्यायाम करतात. पण तरीही त्यांचं वजन काही केल्या कमी होत नाही. अशा लोकांसाठी हा उपाय नक्कीच उपयुक्त ठरू शकतो.
याविषयी डाॅ. गीता श्रॉफ यांनी प्रकाशित केलेली माहिती नवभारत टाईम्सने प्रकाशित केली आहे. यामध्ये डॉक्टर असं सांगत आहेत की वजन कमी करणाऱ्या व्यक्तींनी जर पुढील काही प्रकारचे चहा प्यायले तर त्यामुळे त्यांची पचनशक्ती आणि चयापचय क्रिया सुधारू शकते आणि त्यामुळे वजन भराभर कमी होण्यास मदत होते. ते चहा नेमके कोणते ते पाहूया..
सगळ्यात पहिला आहे ग्रीन टी. यामध्ये असणारे काही घटक आणि ॲण्टीऑक्सिडंट्स यामुळे चयापचय क्रिया चांगली होते आणि त्यामुळे शरीरावर चरबी साचून राहण्याचं प्रमाण बरंच कमी होतं. यामुळे वजन कमी करणं बरंच सोपं होतं.
ब्लॅक टी सुद्धा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्यामध्ये असणारे फ्लावोनाईड्स शरीरात जमा झालेले फॅट्स कमी करण्यास मदत करतात. याशिवाय योग्य प्रमाणात जर तुम्ही ब्लॅक टी प्यायलात तर त्यामध्ये असणाऱ्या कॅफिनमुळे तुम्हाला जास्तीत जास्त वेळ ॲक्टीव्ह राहण्यासही मदत होते.
तिसऱ्या प्रकारचा चहा म्हणजे लेमन हनी टी. हे एक डिटॉक्स ड्रिंक म्हणून ओळखलं जातं. यामुळे शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ शरीराबाहेर काढून टाकले जातात आणि त्यामुळे शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते.
आल्याचा काढा जर तुम्ही नियमितपणे प्यायलात तर तुमची पचनक्रिया चांगली होते आणि त्याचा फायदा वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित ठेवण्यासाठी होतो. याशिवाय आल्यामध्ये असणारे अँटिइन्फ्लेमेटरी गुणधर्म शरीरावरील सूज कमी करण्यास मदत करतात.
दालचिनीसुद्धा चयापचय क्रिया अधिक चांगली करण्यासाठी तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते.