प्रोटीन पावडर कशाला खायच्या? खा ५ हेल्दी प्रोटीन रिच गोष्टी, मिळेल भरपूर एनर्जी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2022 1:57 PM 1 / 9१. फिटनेस टिकविण्यासाठी रोजचं वर्कआऊट गांभिर्याने आणि अगदी नियमितपणे करणारे अनेक लोक आहेत. कोणता व्यायाम किती वेळ करावा, हे त्यांना ठाऊक असतं. पण व्यायाम करण्यापुर्वी नेमकं काय डाएट घ्यावं, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो.2 / 9२. त्यामुळे मग कधी कधी वर्कआऊटपुर्वी खूप जास्त खाणं झाल्याने नीट व्यायाम जमत नाही, तर कधी खूपच कमी खाल्ल्याने व्यायाम करताना थकवा जाणवतो.3 / 9३. अशा दोन्ही पद्धतीचा त्रास टाळण्यासाठी आणि व्यायाम करताना तुमच्या शरीरात उर्जा टिकून राहण्यासाठी पुढे दिलेले ५ पदार्थ तुम्ही खाऊ शकता. या पदार्थांमधून तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतील.4 / 9४. शाकाहारी लोकांसाठी बदाम हा प्रोटिन्सचा उत्तम स्त्रोत आहे. प्लॅन्ट बेस्ड प्रोटीनचे प्रमाण बदाममध्ये भरपूर असते. भिजवलेले ५ ते ७ बदाम खाणं अधिक उत्तम. अलमंड मिल्कच्या स्वरुपातही तुम्ही ते घेऊ शकता.5 / 9५. चवदार अशा ग्रीक योगर्टमध्येही प्रोटीन्स भरपूर असते. त्याशिवाय त्यातून आपल्याला व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन ए आणि कॅल्शियमदेखील चांगल्या प्रमाणात मिळते. 6 / 9६. ओट्स हे देखील वर्कआऊटच्या आधीचं उत्तम स्नॅक्स ठरू शकतं. त्यात प्रोटीन्स बरोबरच फायबरही मोठ्या प्रमाणावर असतात. कार्ब्स रिलिज करून वर्कआऊट दरम्यान उर्जा टिकवून ठेवण्यासाठी ओट्स उपयुक्त ठरतात. 7 / 9७. वर्कआऊटपुर्वी वेगवेगळ्या प्रकारचा सुकामेवा खाणेही उत्तम ठरते. स्नायूंमधली ताकद वाढविण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो.8 / 9८. केळी, पेरू, अव्होकॅडाे, संत्री अशी फळंही वर्कआऊटपुर्वी खाणं फायदेशीर ठरतं.9 / 9९. थोड्या प्रमाणात ब्राऊन राईस खाऊनही तुम्ही उत्तम उर्जादायी वर्कआऊट करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications